तरुण भारत

अमरनाथ, कैलास मानसरोवर यात्रा नोंदणी लांबणीवर

कोरोना विषाणू फैलावाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

कोरोना व्हायरसमुळे सर्वसामान्यांचे जीवन विलक्षणरित्या प्रभावीत केले असून अनेक धार्मिक यात्रांना ‘बेक’ लागला आहे. बाब अमरनाथ आणि कैलास मानसरोवर यात्रांची नोंदणीही यामुळे लांबणीवर टाकावी लागणार आहे. अमरनाथ यात्रा 23 जूनपासून सुरू होत असून यासाठी 1 एप्रिलपासून नावनोंदणी सुरू होणार होती. तथापि कोरोना व लॉकडाऊनमुळे ती 15 एप्रिलपर्यंत लांबणीवर टाकली आहे. शिवाय पुढील तारीख नंतर कळवली जाईल, असेही  म्हटले आहे. दुसरीकडे कैलास मानसरोवर यात्रा तर रद्द करावी लागेल, अशी चिन्हे आहेत.

मानसरोवर यात्रेसाठी परराष्ट्र मंत्रालयासह केएमव्हीएन, आयटीबीपी, पिढोरगढ जिल्हा प्रशासन यांची संयुक्त बैठक होऊन यात्रेकरुंच्या संख्येबाबत निर्णय घेतला जातो. त्यानंतर नोंदणीकर सुरू होती. यंदा अद्यापही बैठकच झालेली नसल्याने ही नोंदणी अनिश्चित कालासाठी लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्यावर्षी 22 फेब्रुवारीला बैठक होऊन 17 मार्चपासून नोंदणी सुरू झाली होती. यात्रा तयारीसाठी कैलास मानसरोवर निगम प्रबंधन परराष्ट्र मंत्रालयाच्या परवानगीची वाट पहात आहे. मात्र बैठकच झाली नसल्याने यंदा कैलास मानसरोवर यात्रा रद्द होण्याची शक्यता आहे.

Related Stories

लढाऊ विमाने खरेदीसाठी स्वित्झर्लंडमधील नागरिकांचा विरोध

datta jadhav

सरसंघचालक मोहन भागवत रविवारी स्वयंसेवकांशी साधणार संवाद

prashant_c

मध्य प्रदेश : कोविड 19 विरुध्द लढण्यासाठी रिलीफ फंडामध्ये मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्री करणार मदत

pradnya p

दिल्लीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 27 हजार पार

pradnya p

लडाख : सीमारेषेवर चिनी सैनिकांचा पुन्हा घुसखोरीचा प्रयत्न

datta jadhav

महाराष्ट्रातील 54 पोलिसांना राष्ट्रपती पोलिस पदक

prashant_c
error: Content is protected !!