तरुण भारत

… तर अमेरिकेत होऊ शकतात 2 लाखांहून अधिक मृत्यू

ऑनलाईन टीम / न्यूयॉर्क :

अमेरिकेसारखा बलाढय देशही कोरोनापुढे हतबल झाला आहे. अमेरिकेला लवकरात लवकर कोरोनावर नियंत्रण मिळवता आले नाही तर 2 लाखाहून अधिक नागरिकांचा मृत्यू होऊ शकतो, असा भीतीदायक अंंदाज अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ ॲलर्जी अँड इन्फेक्शन डिसिसचे संचालक डॉ. ॲन्थनी फौसी आणि डेबोराह बिरक्स यांनी व्यक्त केला आहे.   

Advertisements

  अमेरिकेत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. अमेरिकेत आतापर्यंत 1 लाख 88 हजार 592 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 4055 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आर्थिक महासत्ता म्हणून जगावर दबदबा असलेली अमेरिका आता कोरोना विषाणूमुळे हादरली आहे.    

अमेरिकेत कोरोनाला रोखण्यासाठी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारचे सर्व पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत. तरीही अमेरिकेत कोरोनावर नियंत्रण मिळवता आले नाही. ट्रम्पही या भीषण संकटापुढे हतबल झालेले दिसत आहेत. 

अँथनी फौसी आणि डेबोराह बिरक्स म्हणाले की, अमेरिकेत सर्व काही लॉकडाऊन करून, तसेच सोशल डिस्टन्सिंगच्या सूचनांचे पालन करुनही 1 लाख ते 2 लाख 40 हजार अमेरिकन नागरिकांचा मृत्यू होऊ शकतो. जर काहीच  केले नाही तर अमेरिकेत 1.5 मिलियन ते 2 मिलियनपर्यंत मृत्यूचा आकडा वाढू शकतो, असे या दोघांनी इशारा देत म्हटले आहे. डेबोराह बिरक्स यांनी एक तक्ता सादर करत म्हटले की, देशात या आजारामुळे एक लाख ते 2 लाख 40 हजार लोकांचा मृत्यू होऊ शकतो. सोशल डिस्टन्सिंग काम करत आहे आणि त्याचा चांगला परिणामही दिसत आहे. कदाचित हिच आतापर्यंतची सर्वांत चांगली रणनीति आहे.

Related Stories

रशियात परतताच नवलनी यांना अटक

Patil_p

नितीशकुमार यांचे राज्यपालांकडे त्यागपत्र

Omkar B

नव्या स्ट्रेनचे थैमान; ब्रिटनमध्ये एका दिवसात आजवरची सर्वाधिक रुग्णवाढ

datta jadhav

चीनमधील रॅकून डॉग्जही कोरोनाचे प्रसारक

Patil_p

अनलॉक-३ : ‘या’ वाहतुकीवरील बंदी हटवा; केंद्राचे राज्यांना आदेश

triratna

ऑस्ट्रेलियात गूगल, फेसबुकला बातम्यांसाठी मोजावे लागणार पैसे

datta jadhav
error: Content is protected !!