तरुण भारत

उत्तर प्रदेशात कोरोनाचा पहिला बळी

ऑनलाइन टीम / लखनऊ :

उत्तर प्रदेशात कोरोना व्हायरसमुळे एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यांमध्ये वृध्द व्यक्तीची संख्या अधिक होती. मात्र या या व्हायरस ने आता तरुणांना देखील ग्रासण्यास सुरुवात केली आहे. 

Advertisements

मिळालेल्या माहितीनुसार, मृत झालेला तरुण बस्ती येथील असून तो फक्त पंचवीस वर्षांचा होता. इतक्या कमी वयात कोरोणामुळे मृत्यु झाल्याची पहिलीच घटना आहे. बी आर डी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. के जी एम यू मध्ये रुग्णाचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यामधून त्याला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते.

दरम्यान, प्रशासनाकडून बस्ती जिल्ह्यातील युवकाचे घर व आजूबाजूचा परिसर सील करण्यात आला आहे. हा तरुण काही दिवसांपूर्वी परदेशातून आल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. सध्या उत्तर प्रदेश मध्ये कोरोना रुग्णांची संख्या शंभरच्या वर पोहोचली आहे. 

Related Stories

कृत्रिम ग्लेशियरवर अवलंबून गावकरी

Patil_p

भारत-चीन संघर्षातील शहिदांची नावे झाली जाहीर

datta jadhav

उत्तराखंडातील लॉकडाऊनमध्ये वाढ; 1 जूनपर्यंत निर्बंध कायम

Rohan_P

… पण ही ओबीसींची शुद्ध फसवणूक : शरद पवार

Rohan_P

शोपियामधील चकमकीत दोन दहशतवादी ठार

tarunbharat

पंतप्रधान मोदी साधणार देशवासियांशी संवाद

Patil_p
error: Content is protected !!