तरुण भारत

. बीपीसीएल खरेदीच्या निविदा सादर करण्यास मुदत वाढ

13 जूनपर्यंत निविदा दाखल करण्यास सरकारकडून कालावधी वाढविला

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

Advertisements

केंद्र सरकारने कोरोना विषाणूचा देशातील वाढता धोका लक्षात घेत आणि लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड(बीपीसीएल) मधील हिस्सेदारी विकण्यासाठीची मागविण्यात येणाऱया निविदांसाठीची मुदत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे नियोजित मुदत सोडून नवीन मुदत 13 जूनच्या सायंकाळी पाच वाजेपर्यंत सदरच्या निविदा सादर करण्यात येणार असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे.

सरकार बीपीसीएलमधील आपली संपूर्ण 52.98 टक्के इतकी हिस्सेदारी विकणार आहे. यासाठी 7 मार्च रोजी बोली लावण्यास निमंत्रण देण्यात आले होते. त्यानंतर 2 मे पर्यंत यासंदर्भातील निविदा सादर करण्याची मुदत निश्चित करण्यात आली होती. डिपार्टमेंट ऑफ इन्वेस्टमेंट ऍण्ड पब्लिक असेट मॅनेजमेन्टच्या कागदपत्रांनुसार बीपीसीएलमधील सरकारी हिस्सेदारी 114.91 कोटी इक्विटी समभागांच्या बरोबरीत आहे.

बोलीसाठी आवश्यक संपत्तीची गरज

सदर विक्रीसाठी बोली दोन टप्प्यात लावण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात खरेदीला उत्सुक असणाऱया खरेदीदारांना दुसऱया टप्प्यासाठी वित्तीय बोलीसाठी संधी मिळणार आहे. कोणत्याही खासगी कंपनीकडे कमीत कमी 10 अब्ज अमेरिकन डॉलर इतकी गुंतवणूक करण्याची क्षमता असयाला हवे असेही स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

Related Stories

तेजीच्या सुरूवातीनंतर शेअर बाजार घसरणीसह बंद

Patil_p

जनधन योजनेमध्ये एकूण 41.93 कोटी खाती

Patil_p

डिजिटल पेमेन्ट 2025 पर्यंत तिप्पट?

Patil_p

ऍपलचा लाँचिंग कार्यक्रम 14 सप्टेंबरला

Patil_p

फार्मा उद्योगाला पीएलआय स्कीम लागू

Patil_p

5-जी कनेक्शन 35 कोटीवर पोहोचणार

Patil_p
error: Content is protected !!