तरुण भारत

मडगावातील 450 परप्रांतीय मजुरांची नावेली इनडोअर स्टेडियममध्ये सोय

प्रतिनिधी/ मडगाव

मडगाव पालिका क्षेत्रातील रोजंदारीवरील कामगार, वाहनांमध्ये माल चढविणारे लोडर, कचऱयातील साहित्य गोळा करणारे तसेच परराज्यांतून येऊन काम करणारे अशा डोक्यावर छत नसलेल्यांना सध्या नावेली येथील इनडोअर स्टेडियममध्ये आसरा देण्यात आला आहे. सुमारे 450 जणांची येथे सोय करण्यात आली आहे.

Advertisements

लॉकडाऊन करण्यात आल्यानंतर पदपथ, उद्यान व अन्य मिळेल त्या जागी हे बेघर कामगार राहत आले होते. काही जण कंत्राटदारांकडे काम करत होते, तर अन्य उदरनिर्वाहासाठी मिळेल ती कामे करत होते. हॉटेल वा गाळय़ांवर त्यांना जेवण घ्यावे लागत होते. लॉकडाऊननंतर त्यांना एकवेळचे जेवण मिळणेही कठीण झाले होते.

मडगाव पालिकेसमोर ते सुरुवातीस गोळा होत होते. तेव्हा काही बिगरसरकारी संस्थांकडून त्यांच्या जेवणाची सोय करण्यात येत होती. मात्र चार दिवसांपूर्वी जिल्हा प्रशासनाने अशा बेघर लोकांना नावेलीतील इनडोअर स्टेडियममध्ये आसरा दिला. जिल्हा प्रशासनाने त्यांच्या जेवणाचीही सोय केली आहे.

मडगाव पालिकेने या सर्व बेघरांची नावे व पत्ते अशा नोंदी घेतल्या असल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली. या सर्वांची डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. हे बेघर येथून बाहेर पडू नयेत तसेच त्यांच्याकडून सोशल डिस्टन्सिंग पाळले जाईल याची काळजी प्रशासनाकडून घेण्यात येत आहे.

Related Stories

भाजप स्वबळावर निवडणूक लढवणार

Amit Kulkarni

वैफल्यग्रस्ततेतून खंवटेंची मुख्यमंत्र्यांवर टीका

Omkar B

अध्यक्षपदासाठी इच्छूक नाही

Patil_p

नाटय़कला जीवनाला आनंद देतात : रमेश वंसकर

Patil_p

मुख्यमंत्री आज व्हिडिओ कॉन्फरन्सीद्वारे पंतप्रधानांशी चर्चा करतील

Omkar B

पिसुर्ले भागातील बेकायदा चिरेखाणी जैवविविधतेच्या मुळावर

Patil_p
error: Content is protected !!