तरुण भारत

कोरोनाच्या धास्तीत कांदा आला तेजीत

बुधवारी एपीएमसीमध्ये 175 हून अधिक ट्रक कांदा दाखल :

अनंत कंग्राळकर/ बेळगाव

Advertisements

महिन्यापूर्वी कांद्याचे दर उतरले होते. मात्र लॉकडाऊनमुळे पुन्हा कांद्याचा दर प्रति किलो 50 ते 60 रुपये झाला होता. बुधवारी एपीएमसीमध्ये 175 हून अधिक ट्रक कांदा दाखल झाला असून इतका कांदा विक्री कोठे करणार, असा प्रश्न व्यापाऱयांसमोर निर्माण झाला आहे. त्यामुळे मंगळवारपर्यंत आवक बंद ठेवण्याचा विचार त्यांनी चालविला आहे. कांद्याचा तुटवडा संपुष्टात आला असून, बुधवारी बाजारपेठेत प्रति क्विंटल 1800 ते 2200 दराने कांद्याची विक्री झाली असल्याची माहिती कांदा-बटाटे व्यापारी संघटनेच्या अध्यक्षांनी दिली.

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी देशात 21 दिवस लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. याची अंमलबजावणी काटेकोरपणे केली जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना घराबाहेर पडण्यावर बंदी घालण्यात आली आहे. नागरिक एकत्र आल्यास विषाणूचा प्रसार होण्याची शक्मयता असल्याने मार्केट तसेच सार्वजनिक ठिकाणी नागरिकांना येण्यास बंदी घालण्यात आली आहे. मागील आठ दिवस सर्वच व्यवहार ठप्प झाल्याने नागरिकांना जीवनावश्यक साहित्य व दैनंदिन जीवनातील भाजीपाला-धान्य आदींचा तुटवडा भासू लागला आहे. लॉकडाऊनमुळे जीवनावश्यक वस्तुंचे दर दुप्पट झाले आहेत. त्यामुळे केवळ जीवनावश्यक साहित्य पुरविण्यासाठी संचारबंदी शिथिल करण्यात आली आहे. जीवनावश्यक साहित्य, भाजीपाला, रेशनधान्य आदी विविध साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी व्यापाऱयांना आणि विपेत्यांना पास उपलब्ध केले आहेत. सध्या विविध साहित्यांचा तुटवडा भासू लागल्याने दुप्पट दराने खरेदी करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. 

कामधंदा बंद करून घरात बसलेल्या नागरिकांना आर्थिक अडचणदेखील भासत आहे. अशातच जीवनावश्यक वस्तुंचे दर वाढल्याने आर्थिक भुर्दंड बसत आहे. सर्वसामान्यांचे हाल होत असल्याने जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून देण्यास प्रशासनाने मुभा दिली आहे. मागील आठ दिवसात कांद्याचा तुटवडा भासल्याने महिन्याभरापूर्वी कमी झालेल्या कांद्याचे दर पुन्हा वाढले आहेत. प्रतिकिलो 50 ते 60 रुपये दराने कांदा खरेदी करण्याची वेळ सर्वसामान्य नागरिकांवर आली होती मार्केट यार्डमध्ये कांद्याची आवक झाली नसल्याने दर वाढले होते. उपलब्ध कांदा विपेत्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कोणतीच सुविधा उपलब्ध नव्हती. त्यामुळे नागरिकांना जादाचे पैसे मोजावे लागले. मात्र जीवनावश्यक वस्तुंची ने-आण करणाऱया वाहनांना परवानगी देण्यात आली असल्याने बुधवारी महाराष्ट्रामधून 175 ट्रक कांद्याची आवक एपीएमसीमध्ये झाली आहे. यावेळी झालेल्या लिलाव प्रसंगी प्रति क्विंटल 1800 ते 2200 रूपयापर्यंत कांद्याचा दर होता. यामुळे कांद्याचे दर उतरले असून, नागरिकांना कमी दरात कांदा उपलब्ध झाला आहे. 

महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे कोल्हापूर, सांगली, पुणे अशा विविध शहरांतील बाजारपेठा पूर्णपणे बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे सासवड, पुणे, कुंडल, बारामती, भोर अशा विविध भागातील कांदा बेळगाव एपीएमसी बाजारपेठेत दाखल झाला. इंदोर, आजरा आणि स्थानिक परिसरातून 35 ट्रक बटाटा बाजारपेठेत दाखल झाला आहे. पण कांद्याची आवक अचानक वाढल्याने आलेल्या कांद्याची निर्यात कोठे करायची, असा प्रश्न व्यापाऱयांसमोर निर्माण झाला आहे. गोवा, बेळगाव, हुबळी, धारवाड, तामिळनाडू, बेंगळूर अशा विविध बाजारपेठेत बेळगावच्या एपीएमसीमधून कांदा पाठविला जातो. पण त्या बाजारपेठेमधून कांद्याची मागणी नाही. तसेच वाहतूक बंद असल्याने उपलब्ध कांदा कसा पाठविणार, अशी समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे उपलब्ध असलेला कांदा बेळगाव व गोवा परिसरातील विपेत्यांना पुरवठा करण्याचा निर्णय कांदा-बटाटे व्यापारी संघटनेने घेतला आहे. येत्या मंगळवारपर्यंत कांद्याची आवक झाल्यास तो उतरवून घ्यायचा नाही, असा निर्णयदेखील घेण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

वाहनचालक-वाहनांमधून येणाऱया नागरिकांची वैद्यकीय चाचणी करा

ज्या शहरातून कांद्याची आवक झाली आहे त्या भागात कोरोनाचे रुग्ण असल्याचे निदर्शनास आले आहे. पण बेळगाव एपीएमसीमध्ये येणाऱया वाहन चालकांची तपासणी केली जात नसल्याची बाब निदर्शनास आली आहे. सुरक्षित अंतर ठेवणे, नागरिकांनी एकत्र येऊ नये असे आवाहन करण्यात येत आहे. मात्र, याचे पालन एपीएमसीमध्ये होत नसल्याचे दिसून आले. त्यामुळे कोरोनाचा प्रसार होणार नाही याची खबरदारी कोण घेणार, असा मुद्दा ऐरणीवर आला आहे.  परगावांहून आलेल्या वाहनचालकांची वैद्यकीय चाचणी करण्यात येत होती. पण वाहनांची संख्या वाढल्याने वैद्यकीय चाचणी करण्याचे थांबविण्यात आले आहे. त्यामुळे एपीएमसी आणि प्रशासनाने याची दखल घेऊन वाहनचालकांची व वाहनांमधून येणाऱया नागरिकांची वैद्यकीय चाचणी करावी, अशी मागणी महेश सचदेव, विवेक पाटील, विश्वास टुमरी आदींनी केली.

Related Stories

नाला स्वच्छतेकडे मनपा अधिकाऱयांचा कानाडोळा

Amit Kulkarni

कारवर भिंत कोसळली

Amit Kulkarni

इंजिनिअर तरुण करतोय गो-पालन तरुणांसमोर ठेवला आदर्श

Patil_p

बीपीएल रेशनकार्डधारकांना आता माणसी 10 किलो तांदुळ मोफत

Patil_p

मार्च अखेरपर्यत साडेआठ कोटी घरपट्टी वसुल करण्याचे उद्दिष्ट

Patil_p

पंचवीस टक्के वाढ करून घरपट्टी चलन देण्याचा सपाटा

Patil_p
error: Content is protected !!