तरुण भारत

हापूस निर्यातीमधील अडचणी सोडवण्यासाठी ‘वॉररुम’!

निर्यातदारांना सर्व सेवा एकाच छताखाली

प्रतिनिधी/ रत्नागिरी

Advertisements

हापूस निर्यातीमधील अडथळे दूर करण्यासाठी कृषी पणन मंडळातर्फे वॉर रुमची स्थापना करण्यात आली आह़े हापूस निर्यातदाराला ज्या सुविधा लागतात त्या सगळ्य़ा तत्काळ एकाच छताखाली उपलब्ध केल्या जाणार असल्याची माहिती कृषी पणन मंडळाचे सरव्यवस्थापक भास्कर पाटील यांनी दिली. या निर्णयामुळे हापूस निर्यातदारांना दिलासा मिळाला आह़े

  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्यापाऱयांना हापूस निर्यातीमध्ये अडचणी येत होत्या, त्यावर शासनस्तरावर तोडगा काढण्यात आला आह़े  त्यामुळे निर्यातीमध्ये येणाऱया अडचणी, शंका यांच्या समाधानासाठी कृषी पणन मंडळाकडून निर्यातदारांच्या अडचणी सोडवण्यासाठी वॉररुम सुररू करण्यात आली आह़े निर्यातदाराला पॅकिंग सामान, वाहतुकीसाठी आरटीओ विभागाच्या परवानग्या, निर्यातीसाठी लागणारे विविध परवाने, प्रमाणपत्रे, या सगळय़ांमध्ये सूसुत्रता येण्यासाठी कमिटी सुध्दा स्थापन करण्यात आली आह़े ही कमिटी निर्यातदाराला येणाऱया अडचणीबाबत निर्यातदाराला मार्गदर्शन व मदत करणार असल्याचेही पाटील यांनी सांगितल़े

वाशी येथील एपीएमसी आजपासून सुरू

   कोरोनामुळे हापूस विक्री व निर्यातीला फटका बसला आह़े शेतकरी, निर्यातदार यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न केले जात आह़ेत गुरूवार पासून वाशी येथील एपीएमसी सुध्दा चालू होत आह़े त्यामुळे जिल्हाभरातील हापूस बाजार समित्यामध्ये विक्रीकरिता रवाना होणार असल्याचेही शेतकऱयांनी सांगितले त्याच बरोबर हापूस इतर देशांमध्ये पाठवण्यासाठी निर्यातदार सरसावले आहेत़           

 हापूस निर्यात होणाऱया प्रत्येक देशांची स्वतःची अशी वेगवेगळी प्रक्रिया निश्चित केलेली आह़े त्यानुसार निर्यात होणाऱया हापूसवर योग्य ती प्रक्रिया करुन तो वेगवेगळ्या देशामध्ये जाण्यासाठी सज्ज होणार आह़े यासाठी बागायतदार, व्यापाऱयांचे नुकसान टाळण्यासाठी शासनस्तरावर ही उपाययोजना करण्यात येत आह़े

दोन दिवसांत हापूसने बाजारपेठ गजबजणार

रामनवमीच्या मुहुर्तावर गुरूवारपासून कोकणातील हापूसची वाशी मार्केट येथे मोठय़ा प्रमाणावर वाहतुक सुरू होणार असल्याने मुंबईसह अन्य बाजारपेठा हापूसने गजबजणार आहेत. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील लॉकडाऊन व संचारबंदीमुळे पुरेसा खरेदीदार न मिळण्याची धास्ती कायम आहे. त्यामुळे बागायतदारांनी केवळ 50 पेटय़ाच पाठवाव्यात, अशा सूचना दलालांकडून करण्यात आल्याचे समजते.

sss  तयार झालेल्या हापूस मार्केटमध्ये कसा पाठवायचा अशी चिंता बागायतदारांसमोर होती. मात्र जिह्याभरातील हापूस बागायतदार, व्यावसायिकांना कृषी विभागामार्फत वाहतूक परवाने देऊन यावर तोडगा काढण्यात आला. त्यानुसार गुरुवारपासून बागायतदारांनी आपल्या हापूस पेटय़ा मुंबई, पुणे व कोल्हापूर येथील बाजार समित्यामध्ये पाठवण्यास सुरुवात करणार आहेत.

Related Stories

भोस्ते घाटात खासगी आरामबसला अपघात

triratna

पर्यटन सहलींच्या परताव्यासाठी मुंबई ग्राहक पंचायतीचा पुढाकार

Patil_p

मेडिकल कॉलेज निर्मितीसाठी प्रभारी अधिष्ठात्यांची नियुक्ती

Patil_p

आंघोळ करताना विजेचा शॉक लागून संगमेश्वरात एकाचा मृत्यू

triratna

रत्नागिरी जिल्ह्यात पहिल्या दिवशी ४ माध्यमिक शाळा सुरु

triratna

कोरोना रूग्णसंख्येत पुन्हा वाढ

Patil_p
error: Content is protected !!