तरुण भारत

कुपवाड एमआयडीसीत २० हजाराचा बेकायदा दारुसाठा जप्त: दोघांना अटक

प्रतिनिधी / कुपवाड

कुपवाड एमआयडीसीत एका बिअर बार व देशी दारुच्या दुकानालगतच्या मोकळ्या जागेत विक्रीसाठी ठेवलेल्या बेकायदेशीर देशी विदेशी दारु अड्यावर कुपवाड पोलिसांनी बुधवारी सायंकाळी छापा टाकला. या कारवाईत सुमारे २० हजार रुपयांची देशी विदेशी दारुचे बॉक्स जप्त केले. तसेच दोन तरुणांना अटक करण्यात आली.
यामध्ये जयदीप भाटी (वय ४७,रा. गावभाग सांगली) व त्याचा साथीदार संदीप सुतार ( वय ३८,रा. दत्तनगर, बामणोली) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. तर मालक सुभाष माने (रा. बामणोली) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी जिल्ह्यात संचारबंदी लागू केली आहे. जिल्ह्यात लॉकडाऊन असताना बुधवारी सायंकाळी दोन इसम कुपवाड एमआयडीसीतील एका बिअर बार व देशी दारुच्या दुकानालगत असलेल्या मोकळ्या जागेत बेकायदेशीर देशी विदेशी दारुची विक्री करीत आहेत. अशी माहिती सहाय्यक निरीक्षक निरज उबाळे यांना मिळाली. त्यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे उपनिरीक्षक राजू अन्नछत्रे, सहाय्यक पोलिस फौजदार युवराज पाटील, हवालदार सतीश माने,महेश जाधव, शिवाजी जाधव, शिवाजी ठोकळ, इंद्रजित चेळकर,सूरज मुजावर यांनी घटनास्थळी छापा टाकला असता दोन तरुण बेकायदेशीर देशी विदेशी दारुची विक्री करीत असताना रंगेहाथ सापडले.त्यांच्या जवळ अंदाजे वीस हजार रुपयांची देशी विदेशी दारुच्या २५२ बाटल्या जप्त केल्या.
दोन्ही संशयितांना पोलिसांनी ठाण्यात आणून सखोल चौकशी केली असता सदरची देशी विदेशी दारुचे बॉक्स देशी दारु विक्रेते मालक सुभाष माने यांनी बेकायदेशीर विक्रीसाठी दिली असल्याची कबुली या दोघांनी पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी या दोघांना अटक करुन मालक सुभाष माने यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.मालक माने यांनी सदरचा दारुसाठा कोणत्या दुकानातून बाहेर काढून तो विक्री साठी दिलेला आहे. याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी यांचेकडे लेखी कळवून माहिती घेऊन माने यांच्या विरोधात आणखी कडक कारवाई करणार असल्याचे सहाय्यक निरीक्षक उबाळे यांनी सांगितले.

Advertisements

Related Stories

डिव्हिडंड मंजूरीचे अधिकार संचालक मंडळाला द्या : आ. ऋतुराज पाटील

Abhijeet Shinde

“आम्ही काय रेमडेसिवीर पाकिस्तानला किंवा चायनाला देणार होतो का?”

Abhijeet Shinde

नवज्योत सिंग सिद्धू यांनी काँग्रेसबद्दल केले ”हे” वक्तव्य

Abhijeet Shinde

हुतात्मा कार्यस्थळावर ऊसतोड मजुरांच्या मुलांसाठी साखर शाळा सुरू

Abhijeet Shinde

दरोडय़ाच्या गुह्यातील दोन आरोपी जेरबंद

Patil_p

विकास आघाडीच्या नगरसेवकांचा मुख्याधिकारी दालनासमोर आत्मदहनाचा प्रयत्न

Abhijeet Shinde
error: Content is protected !!