तरुण भारत

कास तलाव मार्ग बंद, पर्यटकांना जाण्यास बंदी

फोटो कॅप्शनसध्या बंद ठेवण्यात आलेला कास तलाव परिसर

प्रतिनिधी / सातारा

Advertisements

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वच पर्यटनस्थळे बंद ठेवण्यात आली आहेत. याच अनुषंगाने कास तलाव परिसरदेखील पर्यटकांसाठी आता बंद ठेवण्यात आला आहे.

सध्या पुणे, मुंबई सारख्या ठिकाणी विविध कंपन्यांमध्ये कार्यरत असणाऱया कर्मचायांनी देखील आपल्या गावाची वाट धरली आहे. विशेषतः साताऱयातील अधिकतर नागरिक कामानिमित्त पुणे, मुंबईसारख्या ठिकाणी असतात त्यांनी देखील आता आपल्या गावाकडे परतले आहेत. पण काहींनी या परिस्थितीचे गांभीर्य तितक्या प्रमाणात घेतले नाही. आपण सुट्टीला आल्यासारखे ते सातारा परिसरात असणाऱया विविध पर्यटन ठिकाणी भेट देण्यास प्रयत्न करीत आहेत. याची दखल घेत आता कास तलाव पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला आहे. सर्वत्र बंद असून देखील मागील काही दिवसांपासून या परिसरात पर्यटकांची ये-जा सुरू होती याच पार्श्वभूमीवर हा परिसर सध्या बंद ठेवण्यात आला आहे.

Related Stories

75 टक्के मुक्ती गाठलेल्या सातारा जिल्ह्यात नव्याने 21 बाधित

Abhijeet Shinde

सोलापूर जिल्ह्यात दहा दिवसात पाच हजार अँटिजेन टेस्ट करणार : जिल्हाधिकारी

Abhijeet Shinde

अब्दुल लाट सरपंच अपात्र

Abhijeet Shinde

बेटी बचावसाठी चिमुकलीचे सायकलवरुन देशभ्रमण

Patil_p

ताथवडा घाटात जबरी चोरी

Patil_p

”राज्यशासनाकडे कारखाने वाचवण्यास पैसे आहेत, मग पूरग्रस्तांसाठी का नाहीत ?”

Abhijeet Shinde
error: Content is protected !!