तरुण भारत

बंदच्या काळात पोस्टाने बजावली विविध टप्प्यांवर सेवा : 34 लाखांची उलाढाल

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली :

देशासह संपूर्ण जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. यामुळे जगातील  जास्तीत जास्त देश लॉकडाउनच्या स्थितीत आहेत. या बंदच्या काळात मात्र अत्या वश्यक सेवा सुरु ठेवण्यात आल्या आहेत. यातच देशातील पोस्ट ऑफिस सेव्हिंग बँक(पीओएसबी) यांच्यामार्फत जवळपास 34 लाख आणि इंडिया पोस्ट पेमेन्ट बँकेच्या आधारे 6.5 लाखाची देवाण घेवाण करण्यात आली आहे.

Advertisements

या बंदच्या काळात ऑनलाईन औषध कंपन्या आणि ई कॉमर्स क्षेत्रातील कंपन्यांनी ऍमेझॉनने भारतीय पोस्टाचा उपयोग केला असल्याची माहिती एका अधिकाऱयांनी दिली आहे. औwषधांसोबत अन्य जीवनआवश्यक वस्तूंचा पुरवठाही करण्यात आल्याचे सांगितले. याच काळात आयपीपीबीच्या आधारे 6.5 लाखाची उलाढाल झाली आहे. तर स्पीड पोस्टाच्या मार्फत जवळपास 2 लाख पत्रांचे पार्सल आणि मनी ऑर्डर पाठविण्यात आल्या आहेत.

विविध सेवा

पोस्टाच्या माध्यमातून विविध आर्थिक सेवा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. तसेच मोबाईल पोस्टाची सुविधा आणि कोरोनाशी संबंधीत परीक्षणाची उपकरणे एका ठिकाणाहून दुसऱया ठिकाणी पोहोचवली आहेत. ही सेवा  केरळ, तेलंगणा, उत्तर प्रदेश आणि दिल्लीच्या काही भागांसह अन्य देशभरात ही सोय देण्यात आली आहे.

Related Stories

अभियांत्रिकी निर्यातीसाठी सिंगापूर फेव्हरेट

Patil_p

अशोक लेलँडचा 14 चाकांचा एव्हीटीआर 4120 ट्रक लाँच

Patil_p

डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत

Patil_p

अजून ग्रहण सुटलेले नाही

Omkar B

ऍपलचा आयफोन-12 बाजारात दाखल

Omkar B

आयात घसरण चींतेचीच बाब

Omkar B
error: Content is protected !!