तरुण भारत

‘निजामुद्दीन कनेक्शन’मुळे जिल्हय़ात सतर्कता

वार्ताहर / चिकोडी, कुडची, हुक्केरी

दिल्ली येथील निजामुद्दीन या भागात तबलिगी जमात या इस्लाम धर्मीय संस्थेच्या कार्यक्रमात चिकोडी विभागातील जवळपास 29 जण सहभागी झाले होते. यामधील 15 जण 18 तारखेला आले असून त्यांना क्वारंटाईन विभागात दाखल करण्यात आले आहे. तसेच दिल्लीवारी केलेल्यांमध्ये काही नेत्यांचाही सहभाग असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान परतलेल्या भाविकांसह ते आणखी कोणाच्या संपर्कात आले आहेत काय?, याचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. यासाठी जिल्हा आणि तालुका आरोग्य खात्यासह पोलीस प्रशासनाने तपास मोहीम हाती घेतली आहे.

Advertisements

गेल्या तीन दिवसापासून दिल्लीच्या निजामुद्दीन येथील कार्यक्रमात सहभागी झालेल्या भाविकांमुळे अनेकांची धास्ती वाढली आहे. चिकोडी विभागातील चिकोडी, निपाणी, रायबाग, कागवाड, अथणी येथील अधिकृतरित्या 29 जणांची नावे मिळाली असून त्यामधील 15 जण 18 तारखेलाच कार्यक्रम आटोपून आले आहेत. पण हे 15 जण घरी न जाता दर्ग्यामध्येच वास्तव्यास असल्याचे प्रशासनाच्या लक्षात आले. यानंतर या 15 जणांना जिल्हा व तालुका प्रशासनाने शोधून हॉस्पिटलमधील क्वारंटाईन विभागात दाखल केले आहे. याबरोबरच हुक्केरी तालुक्यातील 5 जणांचीही तपासणी करण्यात आली आहे.

तसेच रायबाग तालुक्यातील कुडची येथील 13 जणांना आणि हारुगेरीमधील एकाला बेळगाव येथे दाखल करण्यात आले असून त्यांची तपासणी करण्यात येत आहे. दिल्लीचा कार्यक्रम आटोपून अनेकजण गावी आले आहेत. यामुळे ते जर कोरोनाबाधितांच्या संपर्कात आले असतील तर ती त्यांच्यासाठीही धोक्याची घंटा आहे. याबरोबर ते आणखी कोणाच्या संपर्कात आले आहेत. त्यांनाही याचा फटका बसण्याबरोबरच संसर्ग वाढण्याची शक्यता आहे.

Related Stories

पदवीपूर्व प्रथम वर्षाला प्रारंभ

Amit Kulkarni

वापरात नसलेल्या वाहनांचे परवाने होणार रद्द

Patil_p

मलबार चॅरिटेबल ट्रस्टतर्फे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वाटप

Amit Kulkarni

शहरातील सर्व्हिस रस्त्यांच्या स्वच्छतेकडे मनपाची पाठ

Amit Kulkarni

सी-बर्ड प्रकल्पाला आज देणार भेट

Amit Kulkarni

‘त्या’ समाजकंटकांवर तातडीने कारवाई करा

Amit Kulkarni
error: Content is protected !!