तरुण भारत

टाळेबंदीमुळे गंगा नदीचे पात्र होतेय स्वच्छ

कोरोना संकटामुळे टाळेबंदी लागू करण्यात आल्यापासून गंगा नदीपात्राच्या स्वच्छतेत मोठी सुधारणा दिसून येतेय. नदीपात्रात कंपन्यांकडून सोडला जाणारा कचरा जवळपास थांबला आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानुसार बहुतांश निरीक्षण केंद्रांमध्ये गंगा नदीचे पाणी स्नानयोग्य आढळून आले आहे. गंगा नदीचे पात्र वन्यजीव तसेच मत्स्यपालनासाठी अनुकुल झाल्याचे संस्थेने म्हटले आहे.

औद्योगिक शहर असलेल्या कानपूरमध्ये गंगानदीचे पात्र स्वच्छ आढळून येत आहे. कानपूर शहरातून बाहेर पडणाऱया औद्योगिक कचऱयाचे प्रमाण प्रचंड होते. पण टाळेबंदीमुळे कंपन्या बंद राहिल्याने नदीचे प्रदूषणही थांबले आहे. हिंडन आणि यमुना या उपनद्यांच्या पाण्याच्या गुणवत्तेतही सुधारणा झाली आहे. टाळेबंदीत गंगेच्या पाण्याची गुणवत्ता अधिक चांगली होण्याची शक्यता आहे.

Advertisements

Related Stories

अमोल कोल्हेंनी अमित शाहांना दिल्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, म्हणाले…

Abhijeet Shinde

कृष्णविवरासंबंधी शोधांसाठी तीन शास्त्रज्ञांना नोबेल

Patil_p

शिवराजसिंह-कमलनाथ यांच्या ताफ्यातील वाहनांच्या धडकेचे वृत्त खोटे

datta jadhav

रविशंकर प्रसाद तामिळनाडूच्या राज्यपालपदी?

Patil_p

मालवाहू जहाजाला बंगालमध्ये जलसमाधी

Omkar B

बिहारमध्ये कोरोना रुग्णांनी ओलांडला 2.61 लाखांचा टप्पा

Rohan_P
error: Content is protected !!