तरुण भारत

‘जमात’च्या कार्यक्रमात सहभागी झालेले बिदरमधील 11 जण कोरोना पॉझिटिव्ह

प्रतिनिधी / बेंगळूर :

कोरोनाबाधितांची संख्या राज्यात वाढतच आहे. गुरुवारी एकाच दिवशी 14 नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 124 वर पोहोचली. धक्कादायक बाब म्हणजे दिल्लीतील निजामुद्दीन भागातील मुस्लिम धर्मिय तबलिगी जमातच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या बिदरमधील 27 पैकी 11 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. उर्वरितांचे वैद्यकीय अहवाल येणे बाकी आहेत.

Advertisements

गुलबर्गा येथील प्रयोगशाळेकडे 27 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवून दिल्यानंतर ही धक्कादायक बाब स्पष्ट झाली आहे. सर्व रुग्णांना बिदरच्या ब्रिम्समधील क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. कोरोनाचे पॉझिटिव्ह असलेले 9 जण जुने बिदर भागातील आहेत. तर एक बसवकल्याण व एक चिटगुप्पा तालुक्यातील मन्नाख्खेळी येथील रहिवासी आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी एच. सी. महादेव यांनी गुरुवारी सकाळी दिली.

जिल्हय़ात 11 जण कोरोनाबाधित आढळून आल्याने कोरोनाग्रस्तांच्या भागात हायअलर्ट घोषित करण्यात आला आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या 98 जणांची शोध घेऊन त्यांना होम क्वारंटाईनमध्ये राहण्याची सूचना देण्यात आली आहे.

…एकाचा कोरोनामुळे मृत्यू?

दिल्लीतील निजामुद्दीन भागात तबलिगी जमातच्या कार्यक्रमात सहभागी होऊन परतलेल्या एका व्यक्तीचा हैदराबादमधील इस्पितळात मृत्यू झाल्याचे समजते. तो कोरोना पॉझिटिव्ह होता, अशी माहिती उपलब्ध झाली आहे. त्यामुळे तो बिदरमधील कोरोनाचा पहिला बळी असल्याचे सांगण्यात येते.

Related Stories

जम्मू काश्मीरमध्ये दिवसभरात 517 नवे कोरोना रुग्ण

Rohan_P

११ ते १४ एप्रिल दरम्यान ‘लसमहोत्सव’ साजरा करण्याची पीएम मोदींची घोषणा

Abhijeet Shinde

श्रम मंत्रालयातील 11 जणांना कोरोनाची बाधा

Rohan_P

‘मेड-इन-इंडिया’ टॅबलेटद्वारे होणार अर्थसंकल्पाचे सादरीकरण

datta jadhav

पंजाब : सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारसी मंजूर, 1 जुलैपासून वाढणार वेतन

Rohan_P

गृहमंत्री अमित शहांनी पुलवामा CRPF कँपमध्ये केला मुक्काम

Abhijeet Shinde
error: Content is protected !!