तरुण भारत

राज्यात आपचे नेते एलवीस गोम्स यांनी केजरीवालच्या नावे राजकारण करू नये-

मंत्री मायकल लोबो यांचा इशारा

प्रतिनिधी/ म्हापसा

आम आदमी पार्टीचे राज्याचे नेते एलवीश गोम्स यावेळी नाहक राजकारण करू पाहत आहे. ते एक चांगले माणूस आहेत पण त्यांनी यावेळी नाहक राजकारण न करता प्रथम प्रत्येक मतदारापर्यंत पोचणे आजकालची गरज आहे. अरवींद केजरीवाल आज प्रत्येकाच्या घरात पोचत आहेत. एलवीश गोम्स यांनी केजरीवालच्या नावे राज्यात मते मागणे बंद करावे. दिल्ली गोव्यापेक्षा वेगळी आहे. येथे एलवीश गोम्स आपण अरवींद केजरीवाल म्हणू शकत नाही. त्यांच्या नावे मते मागू नका. नागरिकांकडे जाताना तुमचे काम दाखवा. आपण केजरीवाल नंबर 2 असे गोव्याच्या जनतेला स्पष्ट सांगा तेव्हाच तुमचे कार्य पाहून जनता तुम्हाला मते देणार असे कचरा व्यवस्थापन मंत्री मायकल लोबो यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

दिल्लीत ते जनतेबरोबर राहीले म्हणून तेथे केजरीवाल जिंकून आले. येथे ती परिस्थिती नाही. केजरीवाल यांनी चांगले काम केले म्हणून जनतेने मला मते द्यावीत असे गोम्स म्हणू शकत नाही. दिल्ली आणि गोव्यात खूप फरक आहे. गोव्याची जनता खूप हुशार आहे त्यांना सर्व काही माहीत आहे. आपचे एलवीश गोम्स यांनी कोरोना विषयी राज्यात नाहक राजकारण करू नये असा सल्लाही त्यांनी दिला. आज परिस्थिती वेगळी आहे. आठ दिवस पूर्वी मास्क मिळत नव्हती ती मिळवून देण्याचा प्रयत्न आपण केला. जनतेला किराणा मालही उपलब्ध करून दिला. गाडय़ांना परमीट (परवानगी) पासही करून दिले आहेत मात्र आपचे एलवीस गोम्स येथे आपल्याविषयी नाहक राजकारण करू पाहत आहे असे ते म्हणाले.

किराणा मालाची, भाज्याची आता कमतरता भासणार नाही

किराणामाल काही आमदारांनी किराणा दुकानावरूनच खरेदी केला. काही ठिकाणी या मालाची कमतरता भासली. याचे कारण जो म्हाल(किराणा साहित्य) राज्यात कोल्हापूर, महाराष्ट्र आदी ठिकाणाहून येत होता तो बंद झाला. आता सर्व बॉर्डर हा माल राज्यात आणण्यासाठी सर्वत्र खुला झाल्याने आता मालाची कमतरता नाही असे मंत्री मायकल लोबो म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकाऱयांना पास देण्यासाठी आदेश दिल्याने सर्वांनीच पासची मागणी केली त्यामुळे तेथे मोठय़ा रांगा लागल्या मात्र कुणाला द्यावा हा मोठा प्रश्न होता. तेथे कर्मचारीवर्गही नव्हता. सर्वत्र भीतीचे वातावरण होते. काही सरकारी कर्मचारीवर्ग काम करण्यास पाहत नव्हते. आपल्या ऑर्डर रद्द करण्याची मागणीही अनेकांनी आपल्याकडे केली असे मंत्री म्हणाले, मात्र ती तात्काळ इमरजन्सी होती असे मंत्री लोबो यांनी स्पष्ट केले.

जनतेसाठी आपली सर्वतोपरी मदत

राज्यातील जनतेला प्रशासनासाठी खूप मदत हवी आहे. आपण अनेकांना पास करून दिले आहेत. आज कुणालाही पासची गरज नाही कारण किराणा मालच्या गाडय़ा अडवू नये असा आदेश पंतप्रधानानीही दिला आहे. आज सर्वत्र भाजी, किराणामाल उपलब्ध आहे. आटा/ पीठ नव्हते. फोनवरून गाडय़ा सोडण्यास सांगितले. आपल्या पासची काहींनी तक्रार केली ती योग्य नाही. आपण जनतेसाठी सर्वकाही केले असल्याची माहिती मंत्री लोबो यांनी दिली.

गरिबांचे जास्त पैसे आकारल्यास मी माझ्या पगारातून देतो

राज्यातील सर्व सुपर मार्केट तसेच किराणा दुकान खुली झाली आहेत. तेथे गर्दी न करता घरातील प्रत्येक एकानी जावे. वयोवृद्धांनी तेथे न जाता पर्यवेक्षकांना त्याची माहिती द्यावी. कुणीही अतिरिक्त पैसे आकारू नये. तसे आढळल्यास त्वरित पोलिसांना माहिती द्यावी. जे कुणी गरीब आहेत आणि ज्यांनी कुणी त्या काळात अतिरिक्त महाग, पैसे खरेदी करून भाजी वा आदी सामान घेतले त्यांना आपण आपल्या पगारातून परतफेड देण्यास तयार आहे असे मंत्री मायकल लोबो यांनी स्पष्ट केले व जनतेचे आभार मानले.

आमदार, मंत्रीही शेवटी माणूसच आहे…..

दरम्यान मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री तुम्ही अन्य दोघे तिघेजणच 40 आमदारापैकी जनतेबरोबर या काळात दिसतात. अन्य बाकी मुख्यमंत्री सहकार्य करीत नाही काय? असा प्रश्न मंत्री मायकल लोबो यांना केला असता ते म्हणाले, आमदार, मंत्रीही शेवटी माणूसच आहे. प्रत्येकजण आपल्या जीवाला घाबरतो. स्पेन, इटली या देशातील मृत्यू पाहून सर्वचजण घाबरले, आमचे लोकही घाबरले. पंच, सरपंच, आमदार घाबरले आणि ते साहजिकच आहे. एक लाख ऐंशी हजारजण मृत्यू पावले. देशात मृत्यूचा हाहाकार माजला. राज्यात आज फक्त 100 व्हेंटीलेटर आहेत. अशावेळी आम्ही काळजी घेणे गरजेचे आहे. आम्ही जीवनात कधी घाबरलो नाही. सर्वांना मदत करण्याचा प्रयत्न केला. सर्वांनाच मदत करू शकले नाही. जनतेनेही आम्हाला चांगले सहकार्य केले. वेळेत जनतेने या काळात काळजी सोसली. आज 11 दिवस झाले अन्य 10 दिवस बाकी आहेत. जनतेने घराबाहेर पडू नये. सरकारचा आदेश पाळावा. गोव्यात हा रोग येऊ नये व भारतात येऊ नये असा आम्ही प्रयत्न करू.

हा महाभयंकर रोग हाकलून देण्यासाठी आदेशाचे पालन करा

आम्ही लॉकडाऊन खुले केले तर गोव्याची जनता मुंबईला जाणार व तेथील गोव्यात येणार असे होता कामा नये. बॉर्डर बॉर्डर सिलबंद करायला पाहिजे. जनतेने ये-जा करू नये. केसेस वाढत आहेत ते कमी व्हायला पाहिजे. स्थगित राहता काम ानये. तेव्हाच आमही हालचाली करू शकणार. हे लॉकडाऊन जनतेच्या सुरक्षिततेसाठी आणि हा महाभयंकर रोग हाकलून देण्यासाठी आम्ही आदेशाचे पालन करायलाच हवे असे मंत्री मायकल लोबो म्हणाले.

Related Stories

वेतनाच्या मागणीसाठी मुरगाव पालिका कामगार दुसऱया दिवशीही संपावर,

Amit Kulkarni

किनारी विभाग आराखडय़ाला बोरी ग्रामसभेत विरोध

Amit Kulkarni

नावेलीच्या आस्थरास्थळात मजुरांकडून दारू नेण्याचे प्रकार

Omkar B

मुसळधार पावसाने गोव्याला झोडपले

Omkar B

आज बांबोळीत अंतिम फेरीसाठी नॉर्थईस्ट-एटीके यांच्यात लढत

Amit Kulkarni

फोंडा गट काँग्रेसतर्फे डॉ. आंबेडकर जयंती

Omkar B
error: Content is protected !!