तरुण भारत

मिरजेतील कोरोना लॅबला हिरवा कंदील, *पाच जिह्यातील रुग्णांची होणार तपासणी

प्रतिनिधी/मिरज

मिरज शासकीय रुग्णालयात स्थापन करण्यात आलेल्या कोरोना टेस्ट लॅबमधून पहिल्या नमुना चाचणीला पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी (एनआयव्ही) संस्थेकडून मान्यता मिळाली असून, या लॅबमध्ये आता स्थानिक पातळीवरच कोरोना रुग्णांची तपासणी होणार आहे. पश्चिम महाराष्ट्रात पुण्यानंतर प्रथमच मिरजेत हे लॅब सुरू झाले असून, सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर आणि सिंधुदूर्ग या पाच जिह्यातील कोरोना बाधित रुग्णांची येथे टेस्ट केली जाणार आहे.

दोन दिवसांपर्वी या लॅबमधून काही जणांची तपासणी करण्यात आली होती. पुणे येथील एनआयव्ही लॅबकडे चाचणीसाठी अहवाल पाठविला होता. ही चाचणी योग्य असल्याचा अहवाल देत एनआयव्ही संस्थेने मिरज शासकीय रुग्णालयात कोरोना टेस्ट घेण्यास हिरवा कंदिल दिला आहे. त्यामुळे आता कोरोना रुग्णांच्या चाचण्या पुण्यात न पाठविता मिरजेतच त्याचा अहवाल तयार होणार आहे. त्यामुळे एकाचवेळी अनेकजणांचे कोरोना चाचणी अहवाल विनाविलंब स्थानिक पातळीवरच प्राफ्त होणार आहेत. या लॅबमध्ये डॉ. वनिता कुलकर्णी, डॉ. पंकज जोशी, डॉ. संदीप वाळुजकर हे वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत.

या लॅबमुळे सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदूर्ग या जिह्यातील संशयीत कोरोना रुग्णांचे रिपोर्ट तपासणी होणार आहेत. मिरजेत तयार झालेली ही कोरोना टेस्ट लॅब राज्यातील पुण्यानंतरची पहिलीच अद्ययावत लॅब आहे.

Related Stories

पुण्यात पुढील 7 दिवसांसाठी मिनी लॉकडाऊन! दिवसा जमावबंदी, रात्री संचारबंदी

Rohan_P

राधानगरी तालुक्यात कोरोनाचा पहिला बळी

Abhijeet Shinde

मास्क विक्रीत कोल्हापूर टॉप-2

Abhijeet Shinde

आज राज्यव्यापी बंद

datta jadhav

सांगली : विट्यात ‘ब्रेक दि चेन’ आदेशाची अंमलबजावणी सुरू; लॉकडाऊन सदृश परिस्थिती

Abhijeet Shinde

अनिल देशमुख आज देखील ईडी कार्यालयात गैरहजर, वकील म्हणाले…

Rohan_P
error: Content is protected !!