तरुण भारत

निजामुद्दीन कार्यक्रमाला गेलेले अद्यापही बाहेरच

आतापर्यंत तपासणी केलेले सहाजण प्रवाशी : उर्वरित दिल्ली व महाराष्ट्रात असल्याची माहिती

वार्ताहर/   चिकोडी

दिल्लीच्या निजामुद्दीन या भागात तबलिगी जमात या संस्थेच्या कार्यक्रमात चिकोडी तालुक्यातील भाविकांचाही समावेश होता. सदर भाविक दोन टप्प्यात जमातला गेल्याची माहिती समोर आली आहे. शुक्रवारी मिळालेल्या माहितीनुसार दिल्लीहून रेल्वेद्वारे चिकोडी व निपाणी तालुक्यात आलेल्या 9 जणांची नवी यादी मिळाली असून, यामधील दोघांची तपासणी केली आहे. तर उर्वरित 7 जण विविध ठिकाणी अडकल्याचे समजते. सदर दोघे भाविक नसून त्यांनी जमात कार्यक्रमात सहभागी झालेल्यांसोबत रेल्वेने प्रवास केला आहे. त्यांच्या खबरदारीसाठी तपासणी करण्यात आल्याचे समजले आहे.

चिकोडी तालुक्यातून दिल्लीस गेलेल्यांची संख्या अंदाजे 23 इतकी असल्याची माहिती पुढे आले आहे. दोन दिवसापूर्वी तालुका प्रशासनाला चिकोडीतील 14 जणांची यादी मिळाली होती. त्यापैकी चौघे रेल्वेद्वारे आल्याची माहिती मिळाली. या चौघांची तपासणी केली असता ते नॉर्मल असल्याचे समजते. पण तपासणी केलेले चौघे जमातला गेले नसून जमातला गेलेल्यांच्या सोबत रेल्वेतून प्रवास केलेले प्रवाशी असल्याचे समोर आले आहे. तसेच शुक्रवारी नव्याने 9 जणांची यादी मिळाली असून यातील दोघांची तपासणी करण्यात आली आहे.

एकूण आतापर्यंत 23 जणांची यादी मिळाली आहे. त्यापैकी 6 जणांची तपासणी केली आहे. ते नॉर्मल आहेत तर उर्वरित व्यक्तींशी तालुका प्रशासनाने संपर्क साधला असून काहीजण दिल्लीत तर काही महाराष्ट्रातील विविध भागात असल्याचे सांगितले आहे. जमातला गेलेल्यांपैकी काहीजणांनी स्वत: आम्ही विविध भागात क्वारंटाईन झाल्याचे सांगितले आहे. यामुळे नेमके ते कुठे आहेत याबाबत स्पष्टता नसल्याचेही बोलले जात आहे.

लपंडाव तर नाही

ग्रामीण भागातील अनेकजण निजामुद्दीन कार्यक्रमास गेल्याची माहिती आहे. अशांच्या घरी विचारपूस केली असता ते अद्याप दिल्लीतच असल्याचे घरच्यांनी सांगितले आहे. याबाबत संशय बळावल्याने लपंडावाचा खेळ सुरू असल्याची चर्चा सर्वत्र आहे. यामुळे स्वत:बरोबर इतरांच्या सुरक्षेसाठी दिल्लीस गेलेल्यांनी पुढे येऊन सहकार्य करण्याची गरज व्यक्त होत आहे.

Related Stories

मजगाव ग्रामस्थ डेंग्यू निर्मूलनासाठी आज जिल्हाधिकाऱयांना देणार निवेदन

Patil_p

शहर स्वच्छतेबरोबर सॅनिटायझर करण्यात यावे

Patil_p

भात पीक पोसवणीच्या मार्गावर असतानाच करप्या रोगाने ग्रासले

Patil_p

लोकमान्य ग्रंथालयातर्फे अशोक याळगी यांना श्रद्धांजली

Omkar B

टायर चोरणारी सात जणांची टोळी गजाआड

Rohan_P

म. ए. समितीच्या कार्यकर्त्यांनी आज उपस्थित राहू नये

Patil_p
error: Content is protected !!