तरुण भारत

हुबळीत पोलिसांवर दगडफेक

सामूहिक नमाज पठण करणाऱयांना रोखण्यासाठी गेल्याने कृत्य

वार्ताहर/ हुबळी

Advertisements

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. मात्र या आदेशाचे उल्लंघन करून गटागटाने एकत्र येणाऱयांना खबरदारीच्या सूचना देणाऱयांवरच दगडफेकीच्या घटना घडत आहेत. हुबळीतील मंटूर रोडनजीकच्या अरळीकट्टी कॉलनीत सामूहिक नमाज पठण करणाऱयांना रोखण्यासाठी केलेल्या पोलिसांवरच दगडफेक करण्यात आल्याची घटना शुक्रवारी घडली आहे.

लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी पोलीस सामूहिक नमाजपठण करू नका अशा सूचना देत आहेत. मात्र, हुबळीच्या अरळीकट्टी कॉलनीत सामूहिक नमाज पठण करण्यासाठी आलेल्यांना पोलिसांनी रोखले. त्यांना एकत्र येण्याचे कारण विचारल्यामुळे वादावादी झाली. यावेळी काही जणांनी पोलिसांवर दगडफेक केली. या घटनेत एक पोलीस जखमी झाला असून त्याला हुबळीतील किम्स इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनेप्रकरणी हुबळी शहर पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणी हुबळी शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बळ्ळारीत 21 जण ताब्यात

बेंगळूर : लॉकडाऊनच्या आदेशाचे पालन न करता सामूहिक नमाजपठण करणाऱया 77 जणांना शिमोगा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. नमाजपठणमध्ये सहभागी झालेल्या 7 जणांना ताप असल्याचे आढळून आले आहे. आयनूरनजीकच्या केसविनट्टी येथे शुक्रवारी सामूहिक नमाजपठण करण्यासाठी 70 हून अधिक जण जमल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यांनी डॉक्टरांना बोलावून त्यांची आरोग्य तपासणी केली. नंतर त्यांना क्वारंटाईनमध्ये पाठविण्यात आले. तर ताप असलेल्या 7 जणांना उपचारासाठी मेग्गॉन इस्पितळात दाखल करण्यात आले.

बळ्ळारीत 21 जण ताब्यात

लॉकडाऊनचे उल्लंघन करून सामूहिक नमाजपठण करणाऱया 21 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बळ्ळारी जिल्हय़ातील बल्लाहुणसी येथे ही कारवाई करण्यात आली. बल्लाहुणसी येथील मशिदीत लॉकडाऊनचे उल्लंघन करून नमाज पठण करण्यासाठी 21 जण एकत्र आले होते. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन क्वारंटाईनमध्ये ठेवले आहे.

Related Stories

कोरोना: कर्नाटक ५ व्या क्रमांकावर, सक्रिय प्रकरणांमध्ये दुसऱ्या स्थानी

Abhijeet Shinde

अत्यावश्यक सेवा वगळता वाहनांना प्रवेशबंदी

Patil_p

शिवप्रतिष्ठानतर्फे शिवजन्मोत्सव साधेपणाने साजरा

Patil_p

कर्नाटक राज्यातील एसएसएलसी परीक्षेबाबत 4 मे रोजी निर्णय

Rohan_P

विविध अटींच्या बडग्याने पक्षकारांचे अतोनात हाल

Patil_p

कर्नाटक: खासगी बसच्या भाड्यात १५ टक्क्यांनी वाढ

Abhijeet Shinde
error: Content is protected !!