तरुण भारत

एजबॅस्टन स्टेडियमवर कोव्हिड-19 एनएचएस स्टाफसाठी चाचणी केंद्र

वृत्तसंस्था/ लंडन

ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसच्या संकटाने भीषण रुप धारण केल्याने शासनाकडून अनेक ठिकाणी कोव्हिड-19 चाचणी केंदे उभारण्यात आली आहेत. वॉर्विकशायर क्रिकेट क्लबने आपल्या मालकीचे एजबेस्टन स्टेडियम एनएचएस स्टाफसाठी चाचणी केंद्र उभारण्यासाठी उपलब्ध करून दिले आहे.

बर्मिंगहॅममध्ये या स्टेडियमभोवती कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. वाहनांना या स्टेडियमजवळ पार्क करण्यास बंदी घालण्यात आली आहे. संशयित बाधा झालेल्या कोव्हिड-19 च्या रुग्णांसाठी काम करणाऱया वैद्यकीय स्टाफसाठी या ठिकाणी तपासणी करण्याकरता अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तज्ञ डॉक्टरांचे पथक या ठिकाणी तैनात करण्यात आले आहे. कोरोना व्हायरसमुळे इंग्लंडमधील कौंटी क्रिकेट स्पर्धा 29 मे पर्यंत तहकूब करण्यात आली आहे. कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेऊनच त्यानंतर या स्पर्धेची पुढील तारीख जाहीर केली जाईल. ब्रिटनमध्ये आतापर्यंत 33 हजार लोकांना कोरोनाची बाधा झाली असून त्यामध्ये पंतप्रधान बोरीस जॉन्सन तसेच प्रिन्स चार्ल्स यांचा समावेश होता.

कोरोनाच्या साथीत इंग्लंडमध्ये आतापर्यंत बळींची संख्या 3 हजार झाली आहे.

Related Stories

भारताचा झिम्बाब्वे दौराही रद्द

Patil_p

टी-20 : न्यूझीलंड-विंडीज आज आमनेसामने

Patil_p

सततच्या चाचण्या अन् प्रीती झिंटा म्हणते, मी आता ‘कोव्हिड टेस्ट क्वीन’!

Patil_p

इंग्लंडविरुद्ध टी-20 साठी सुर्यकुमार, किशन, तेवातियाला संधी

Patil_p

किंग्स इलेव्हन पंजाब संघ पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत

tarunbharat

अमेरिकन टेनिस स्पर्धेतून नेव्हारोची माघार

Patil_p
error: Content is protected !!