तरुण भारत

रस्ते बंद.. कठोर निर्बंध

बेळगाव / प्रतिनिधी

बेळगावात कोरोनाचे तीन रूग्ण पॉझिटीव्ह आढळून आल्याच्या पार्श्वभुमीवर आता निर्बंधांचा बडगा अधिक कठोर करण्यात आला आहे. प्रशासनाने काही वेळासाठी सवलती देण्याचे धोरण राबविले होते. परंतु त्या धोरणामध्ये बदल करून आता पुन्हा कठोर निर्बंध लादण्याची मोहीम सुरू झाली आहे. कॅम्प विभागात सर्व बाजुने नाकाबंदी करून प्रशासनाने प्रवेशबंदी करण्यात आली आहे.

Advertisements

शहरातील अनेक मार्गांवर पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. मुभा मिळाल्यामुळे अनेक नागरिकांचा संचार वाढल्याचे चित्र दिसून येत होते. मात्र कोरोना प्रसाराचा धोका वाढण्याचे  चित्र सामोरे आल्यामुळे आता लॉकडाऊन अधिकच कठोरपणे पाळण्याचे धोरण जाहीर झाले आहे. या पार्श्वभुमीवर  शहरातील अनेक मार्गांवर पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. या बंदोबस्ताकरीता कॅम्प भागातील सर्व रस्त्यांवर बॅरिकेड्स लावून संचार रोखण्यात आला आहे. त्याचप्रमाणे इतर प्रमुख चौकांमध्ये देखील पोलीस तैनात करून नागरिकांना प्रवेश बंदीची सूचना देण्यात येत आहे.

Related Stories

आजपासून जिल्हय़ात अनलॉकची अंमलबजावणी

Omkar B

हुक्केरीत दोन दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी

Patil_p

संघाचे जेष्ठ प्रचारक श्री.बाबुराव देसाई यांचे निधन

Rohan_P

निपाणीजवळ दाम्पत्यास लुटले

Patil_p

91 हजार धनाढय़ांची बीपीएल रेशनकार्डे रद्द

Patil_p

विद्यार्थ्यांना यापुढे लॅपटॉपऐवजी टॅब देण्याचा सरकारचा विचार

Patil_p
error: Content is protected !!