तरुण भारत

क्रिस्पी व्हेजिटेबल्स

साहित्य : भाज्याः अर्धी वाटी बेबीकॉर्न, अर्धी वाटी शिमला मिरचीचे तुकडे, अर्धी वाटी कोबी, अर्धी वाटी फ्लावर तुरे, तेल तळण्यासाठी, बॅटरसाठीः अर्धी वाटी कॉर्नफ्लोर, अर्धी वाटी मैदा, 1 चमचा आलं-लसूण पेस्ट, अर्धा चमचा काळीमिरीपूड, 1 चमचा लिंबूरस, चवीपुरते मीठ, इतरः 1 चमचा तेल, अर्धा इंच आलं किसून, 2 लसूण पाकळय़ा चिरून, अर्धी वाटी कांदापात, 1 चमचा सोयासॉस, चवीपुरते मीठ, सजावटीसाठी कांदापात, शेजवान सॉस

कृती : बाऊलमध्ये बॅटरचे साहित्य मिक्स करावे. नंतर त्यात भाज्याचे साहित्य मिक्स करून गरम तेलात क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यावे. कढईत थोडय़ाशा गरम तेलात आलं, लसूण मिनिटभर परतवावे. नंतर त्यात कांदापात, सोयासॉस आणि मीठ टाकून मध्यम आचेवर मिनिटभर परतवून घ्यावे. आता त्यात तळलेल्या भाज्या टाकून एक मिनिट परतवून घ्याव्यात. आता तयार क्रिस्पी व्हेजिटेबल्स कांदापात आणि शेजवानसॉसने सजवून खाण्यास द्या.

Advertisements

Related Stories

डाळ मसाला वडा

Omkar B

झटपट चविष्ट डिश

tarunbharat

शक्करकंदी चाट

tarunbharat

मावा काजू

Omkar B

कुरकुरीत ओनियन रिंग्ज

tarunbharat

चविस्ट मुगलेट

Amit Kulkarni
error: Content is protected !!