तरुण भारत

थंडगार गुलाब फिरनी

घरी गोडाधोडाचा पदार्थ करायचा असेल तर श्रीखंड, गुलाबजाम, रबडी, जिलेबी, रसमलाई असे मोजके पर्याय समोर येतात. रूचीपालट म्हणून तुम्ही गुलाबाची फिरनी बनवून बघा.

साहित्यः दोन लीटर दूध, अर्धा कप तांदूळ, दीड कप कंडेन्स्ड मिल्क, गुलाबाची पानं, दोन चमचे गुलकंद, तीन ते चार चमचे साखर, दोन चमचे गुलाबपाणी किंवा रूह अफ्जा, अर्धा चमचा वेलची पूड, पिस्ता, बदाम आणि काजू, गुलाबाची वाळलेली पानं.

Advertisements

कृतीः तांदूळ धुवून अर्धा तास भिजवून ठेवा. मग तांदूळ रवाळ वाटून घ्या. हे वाटलेले तांदूळ पुन्हा पाण्यात भिजवून ठेवा.  एका पातेल्यात दूध उकळायला ठेवा. उकळी आल्यावर गॅस कमी करा. दुधात वाटलेले तांदूळ घाला. दूध थोडं आटू द्या. मधल्या काळात तांदूळही शिजतील. तांदूळ मऊ शिजल्यानंतर साखर घाला. मग काजू, बदाम आणि पिस्त्याचे काप आणि वेलची पूड घाला. सर्व घटक नीट मिसळून घ्या. साधारण पाच मिनिटांनी गॅस बंद करा. फिरनी थंड होऊ द्या. गुलाबाच्या वाळलेल्या पानांनी सजावट करा. थंडगार गुलाब फिरनी खा.

Related Stories

ब्रेड भुर्जी

tarunbharat

गाजर केक

Omkar B

बटर कुकीज

Omkar B

पेरुची थंडाई

tarunbharat

खरबूज मिल्क शेक

tarunbharat

शेवगा पराठा

Omkar B
error: Content is protected !!