तरुण भारत

राज्यात एकाच दिवशी 16 पॉझिटिव्ह

म्हैसूरमध्ये  कोरोनाचे 7 नवे रुग्ण : तबलिगच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या चौघांचा समावेश

पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 144 वर

Advertisements

प्रतिनिधी / बेंगळूर

राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्यावाढीचा आलेख कमी असताना शनिवारी एकाच दिवशी 16 रुग्णांची भर पडली. त्यामुळे राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 144 वर पोहोचली आहे. राज्यात या जीवघेण्या विषाणूमुळे चौघांचा बळी गेला असून 11 जण संसर्गमुक्त झाले आहेत. शनिवारी म्हैसूरमध्ये 7, बेंगळूरमध्ये 4, मंगळूर 2, बळ्ळारी, उडुपी आणि बेंगळूर ग्रामीण जिल्हय़ात प्रत्येकी 1 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत.

कोरोनासंबंधी आकडेवारी देण्यासाठी राज्य आरोग्य खात्याकडून प्रसिद्ध करण्यात येणारी हेल्थ बुलेटीन प्रसिद्ध केल्यानंतर मंत्री एस. सुरेशकुमार यांनी ही माहिती दिली. बेंगळूरमध्ये घरकाम करणाऱया कोरोना पॉझिटिव्ह महिलेमुळे 21 वर्षीय युवकाला तसेच त्याच्या 57 वर्षीय वडिलांनाही संसर्ग झाला आहे. शिवाय 43 वर्षीय व्यक्तीला कोरोनाबाधिताच्या संपर्कात आल्यामुळे आणि 17 मार्च रोजी दुबईहून परतलेल्या 78 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे.

म्हैसूरमध्ये दिल्लीतील तबलिगच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या चौघांना कोरोनाची लागण झाली आहे. तर एकाला कोरोनाबाधितामुळे संसर्ग झाला आहे. तर अन्य दोघांना कसा संसर्ग झाला, हे अद्याप समजलेले नाही. उडुपीत 22 मार्च रोजी दुबईहून आलेल्या 63 वर्षीय महिलेला कोरोना झाला आहे. त्याचप्रमाणे मंगळूरमध्ये 3 आणि 52 वर्षीय व्यक्ती पॉझिटिव्ह ठरले आहेत.

होस्पेटमध्ये एकाच कुटुंबातील चौघांना लागण

बळ्ळारी जिल्हय़ातील होस्पेटमधील एस. आर. नगर येथील एकाच कुटुंबातील चौघांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांच्या कुटुंबासह शेजारील 10 जणांना जिल्हा इस्पितळात निरीक्षणाखाली ठेवण्यात आले होते. त्या कुटुंबाच्या संपर्कात आलेल्या एका 47 वर्षीय महिलेला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. उर्वरित 9 जणांचा वैद्यकीय अहवाल निगेटिव्ह आला आहे.

Related Stories

छत्तीसगडमध्ये 12 नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

Patil_p

मंदिरांच्या रक्षणासाठी सरसावले सरकार

Patil_p

मुंडन करत भाजप आमदाराची पक्षाला सोडचिठ्ठी

datta jadhav

राज्यसभेचे नवनिर्वाचित 45 खासदार शपथबद्ध

Patil_p

8 मुलांच्या कथित धर्मांतरावरून शाळेवर दगडफेक

Patil_p

जम्मू काश्मीरमध्ये कोरोना रुग्णांनी ओलांडला 65 हजारांचा टप्पा

Rohan_P
error: Content is protected !!