तरुण भारत

गाव गाठण्यासाठी रचला काकीच्या मृत्यूचा बनाव!

खेड पोलिसांच्या सतर्कतेने दोघे ताब्यात, – पांढरे कापड पांघरून काकीचाही सहभाग

प्रतिनिधी/ खेड

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने भीतीपोटी मुंबईहून सिंधुदुर्गच्या (खारेपाटण) दिशेने जाणाऱया 2 तरूणांनी चक्क जिवंत काकीच्या मृत्यूचा बनाव रचला. या नाटकात पाढरे कापड पांघरून काकीही सहभागी झाली.  मात्र खेड पोलिसांच्या सतर्कतेने हा बनाव उघड झाला असून शुक्रवारी रात्री भरणे येथे दोन तरूणांना ताब्यात घेण्यात आले.  या दोघांची प्राथमिक तपासणी करून 14 दिवस संख्यात्मक विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार आहे. 

लॉकडाऊनमुळे जिल्हय़ाच्या सीमांसह तालुक्याच्या सीमादेखील बंद करण्यात आल्या आहेत. मात्र कोरोनाच्या भीतीने चाकरमानी गाव गाठण्यासाठी नवनव्या युक्त्या लढवत आहेत. रेल्वे ट्रकद्वारे पायी प्रवास करण्यासह जंगलातील आडवाटेनेही चाकरमानी गावी डेरेदाखल होत आहेत. मात्र प्रशासन सतर्क झाले असून प्रशासनाकडून त्यांची खेळी मोडीत काढण्यात येत आहे.

मुंबईहून सिंधुदुर्गच्या दिशेने दुचाकीवरून जाणाऱया दोन तरूणांनी गाव गाठण्यासाठी चक्क काकीच्या मृत्यूचा बनावच रचला. हे दोघेजण भरणे येथे आले असता खारेपाटण येथे राहणाऱया काकीच्या मृत्यूचे कारण पुढे करत पोलिसांना पुढे सोडण्याची विनवणी केली. या ठिकाणी रात्रीच्या सुमारास गस्त घालणाऱया सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित गडदे यांना त्यांच्या हालचालींचा संशय आला. खात्री करण्यासाठी त्यांनी घरी व्हिडिओ कॉल करण्यास सांगितले. याचदरम्यान कुटुंबियांनी ठरवल्याप्रमाणे या तरूणांच्या काकीने पांढरा कपडा अंगावर लपेटून घेत पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांचा संशय बळावल्याने याबाबत गावच्या पोलीस पाटलांकडे खातरजमा करण्यासाठी त्यांनी सपर्क साधला. यावेळी मृत्यूचा बनाव उघडकीस आला. पोलिसांनी दुचाकीसह दोघांनाही ताब्यात घेतले. पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांनी काकीच्या मृत्यूचा बनाव रचणाऱया तरूणांची कानउघडणी केली. या दोघांनाही क्वारंटाईन करण्यात आले असून 14 दिवस विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

Related Stories

रत्नागिरी : तालुकानिहाय सेवा वेतन पुस्तकांची होणार पडताळणी

triratna

‘ती’ जागा डंपिंग ग्राऊंसाठी नाहीच!

NIKHIL_N

दराच्या संघर्षात भरडला जातोय काजू बागायतदार

NIKHIL_N

एसटी वाहक-चालकांना सुविधा नाहीत!

NIKHIL_N

अपघातग्रस्त डबे हटवण्याचे काम युध्दपातळीवर

Patil_p

कारमध्ये गुदमरून दोन सख्ख्या चिमुरडय़ा भावंडांचा करूण अंत

Patil_p
error: Content is protected !!