तरुण भारत

राजीवडय़ात आरोग्य पथकाला रोखले

माजी नगरसेवक बिजली खानला अटक

प्रतिनिधी/ रत्नागिरी

Advertisements

कोरोनाचा नवा रूग्ण सापडलेल्या राजीवडा परिसरात शनिवारी वैद्यकीय सर्व्हेसाठी गेलेल्या आशा सेविकांना माजी नगसेवकाने अटकाव केल्याने परिसरात एकच गोंधळ उडाल़ा यावेळी प्रशासकीय कर्मचारी व माजी नगरसेवकात बाचाबाची झाल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणाखाली आणली. शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी माजी नगरसेवक अब्दुल बिजली खान (ऱा राजीवडा, रत्नागिरी) याला शहर पोलिसांनी अटक केल़ी

  पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शहरातील राजीवडा येथे कारोनाचा रूग्ण आढळल्यानंतर परिसरत पोलिसांकडून सील करण्यात आल़ा या भागातील रहिवासी कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात आल्याची शक्यता असल्याने त्यांच्या वैद्यकीय तपासणी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होत़ा त्यासाठी शनिवारी सकाळी वैद्यकीय तपासणीच्या सर्वेसाठी आशा सेविका या परिसरात दाखल झाल्या.

  राजीवडा परिसरात या आरोग्य पथकाकडून सर्व्हे करण्यात येत असल्याचे पाहताच माजी नगरसेवक बिजली खान यांनी त्याला आक्षेप घेतला.  ‘तुम्ही या ठिकाणाहून निघून ज़ा’ कोणताही सर्व्हे करायचा नाही असे या सेविकांना त्यांनी सांगितल़े यावेळी आम्हाला प्रशासनाने सर्व्हेसाठी पाठविले असून आपणही सहकार्य करा, आमचे काम आम्हाला करू द्या असे या अशा सेविकांनी बिजली खान याला सांगितल़े मात्र त्यांनी या सर्व्हेला विरोध करत त्यांना अटकाव केला. या सर्व प्रकारामुळे राजीवडा परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होत़ी

आशा सेविकांना झालेल्या अटकावाची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक ड़ॉ प्रवीण मुंढे, अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, उपविभागिय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, शहर पोलीस निरिक्षक अनिल लाड हे फौजफाटय़ासह घटनास्थळी दाखल झाल़े पोलिसांनी माजी नगरसेवक बिजली खान याला तातडीने ताब्यात घेवून शहर पोलीस ठाण्यात आणल़े तसेच जमावाला सहकार्य करण्याचे आवाहन पोलिसांनी यावेळी केल़े

अडथळा निर्माण केल्यास कठोर कारवाई

पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी राजीवडय़ातील र†िहवाशांना शांतता पाळून सहकार्य करण्याचे आवाहन केल़े आरोग्य सेवक हे तुमच्यासाठीच याठिकाणी आले आहेत. त्यांना योग्य ते सहकार्य कऱा अन्यथा कायद्याने कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिल़ा

पोलीस संरक्षणात सर्वेचे काम

   राजीवडा परिसरात तणावाची निर्माण झालेली परिस्थिती पाहता कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची काळजी पोलिसांकडून घेण्यात आल़ी तपासणीसाठी फिरणाऱया आरोग्य सेवक यांनी पोलीस संरक्षणात आपले काम सुरू केल़े

    पोलिसांनी बंदोबस्त वाढविला

   शनिवारी झालेला प्रकार लक्षात घेता राजीवडय़ातील परिस्थिती नियंत्रणात आली असली तरी तणावपूर्ण झाली आह़े त्यामुळे पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आह़े संपूर्ण परिसर सील करण्यात आला असून सुमारे 200 पोलीस कर्मचारी विविध ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत़

    रात्री मच्छिमार बोटीने प्रवास

  राजीवडा येथे कारोनाचा रूग्ण आढळल्यानंतर पोलिसांनी परिसर सील केला होत़ा दरम्यान रात्री परिसरातील नागरिक मच्छिमार बोटीने प्रवास करत असल्याचे प्रकार स्थानिकांच्या निदर्शनास आल़े रत्नागिरी शहर पोलिसांकडे देखील या घटनेची खबर देण्यात आली होत़ी या प्रकाराची चौकशी करून कारवाई करण्यात येईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले आह़े

 जणगणनेचा सर्व्हे करत असल्याचा गैरसमज

राजीवडा परिसरात अशा सेविका या जनगणनेचे काम करण्यासाठी आल्याचा गैरसमज राजीवडा मधील काही रहिवाशांचा झाला होत़ा त्यामुळे सुरूवातील सहकार्य करण्यास कुणीही पुढे येत नव्हत़े मात्र पोलिसांनी हा जनगणेचा सर्व्हे नसून वैद्यकीय तपासणीसाठी पथक आल्याचे सांगितल्यानंतर नागरिकांनी माहिती देण्यास सुरूवात केल़ी

Related Stories

शिवाजी विद्यापीठातर्फे 50 गुणांची मॉकटेस्ट आजपासून

Abhijeet Shinde

इचलकरंजी पालिकेत लाच घेताना अभियंता जाळ्यात

Sumit Tambekar

गूळ हंगाम सुरु; कारखानदार चिंतेत!

Abhijeet Shinde

करवीर तालुक्यातील बच्चे सावर्डेतील 9 जणांना 10 वर्षे सश्रम कारावास

Abhijeet Shinde

कोल्हापूर जिल्ह्यात दुध,औषध, वृत्तपत्र भाजीपाला, गॅस वगळता सर्वच बंद

Abhijeet Shinde

दिव्यांग असुनही तो करतोय कोरोनाबाबत जनजागृती

Abhijeet Shinde
error: Content is protected !!