तरुण भारत

मडगाव, नजीकच्या परिसरांत अंडय़ांची आवक अचानक वाढली

प्रतिनिधी/ मडगाव

मडगाव व नजीकच्या परिसरांत अचानक अंडय़ांची आवक वाढल्याचे दिसून आले आहे. चिकन व अंडय़ांवर बंदी घालणाऱया पशुसंवर्धन खात्याच्या परिपत्रकाचा आगावू सुगावा लागल्याने सदर प्रकार घडला असल्याच्या प्रतिक्रिया आता पुढे येऊ लागल्या आहेत.

केरळमध्ये बर्ड फ्लूच्या घटना समोर आल्याने चिकन, अंडी व अन्य पोअल्ट्री उत्पादनांची आयात बंद करण्यासंदर्भात उत्तर व दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱयांना सदर परिपत्रक 3 रोजी मिळाले होते. पण ते 1 रोजी तयार करण्यात आल्याने व घाऊक विक्रेत्यांना त्याचा सुगावा लागला असल्याने तेव्हापासूनच अंडय़ांची आवक अचानक वाढल्याचे आढळून आल्याची प्रतिक्रिया माजी नगराध्यक्ष सावियो कुतिन्हो यांनी व्यक्त केली आहे.

अंडय़ांच्या घरपोच वितरणात काहींकडून लूट

30 अंडय़ांची एक क्रेट 120 ते 130 रुपये अशा दराने घेऊन डझनमागे 60 ते 70 रुपये आकारून घरपोच वितरणात सहभाग असलेल्या काहींनी लूट केल्याची टीका कुतिन्हो यांनी केली आहे. सध्या मासे मिळत नसल्याने अंडय़ांना मागणी असल्याने त्याचा फायदा काहींनी उठविला आहे मात्र सद्यस्थितीत अशी लूट माणुसकीला धरून नसल्याचे ते म्हणाले.

आपण काही स्वयंसेवकांमार्फत आपल्या कोलमरड व नजीकच्या परिसरांत म्हणजे मडगावात प्रथम जीवनावश्यक किराणामाल घरपोच पुरविण्याची मोहीम राबविली व आतापर्यंत 200 जणांना किराणामाल पुरविल्याचे त्यांनी नजरेस आणून दिले. 500 रुपये पॅकेजमागे असा दर ठरवून ही सेवा देण्यात आली अजूनही गरजुंना घरपोच किराणामाल पुरविणे सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

Related Stories

कोरोनामुळे दिवसभरात 11 जणांना मृत्यू

Patil_p

पर्वरी येथे साहा. पोलीस उपनिरीक्षकाची आत्महत्या

Amit Kulkarni

ईस्ट बंगालला नमवून नॉर्थईस्ट युनायटेड आता चौथ्या स्थानावर

Amit Kulkarni

तांबडीसुर्ल येथील प्राचीन शिवमंदिरात भक्तांच्या रांगा

Amit Kulkarni

गावणे पूर्वाचार्य जत्रोत्सव 30 रोजी

Patil_p

मॉक ड्रील दरम्यान एटीएस कमांडो जखमी

Patil_p
error: Content is protected !!