तरुण भारत

राज्य तलवारबाजी संघटनेच्या वतीने कोरोनाविरुद्धच्या लढाईत एक लाखाचा निधी

प्रतिनिधी / कोल्हापूर

कोरोना रोगाचा वाढता प्रभाव लक्षात घेता संपूर्ण देश कोरोना विरुद्ध लढा देत आहे. यासाठी पंतप्रधान रिलिफ फंड मध्ये जास्तीत जास्त निधी जमा करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आव्हान केले आहे. क्रीडा क्षेत्रातून यासाठी भारतीय ऑलिम्पिक महासंघाचे सरचिटणीस तथा भारतीय तलवारबाजी महासंघाचे अध्यक्ष राजीव मेहता यांनी पुढाकार घेऊन क्रीडा क्षेत्रातील संघटनांनी जास्तीत जास्त निधी भारतीय ऑलिंपिक संघटनेकडे जमा करण्याचे आव्हान केले आहे.

Advertisements

क्रीडा क्षेत्रातून विविध क्रीडा संघटनांनी पुढाकार घेऊन निधी जमा केला आहे. भारतीय तलवारबाजी महासंघाच्या वतीने पाच लक्ष रुपये निधी कोरोणा विरुद्ध लढा देण्यासाठी जमा करण्यात आला असल्याचे भारतीय तलवारबाजी महासंघाचे अध्यक्ष श्री राजीव मेहता, सचिव श्री बशीर खान, कोषअध्यक्ष मा. श्री. अशोक दुधारे यांनी कळवले आहे.

तसेच महाराष्ट्र तलवारबाजी संघटना व इतर संलग्नित सर्व जिल्हा तलवारबाजी संघटनेने देखील पुढाकार घेऊन एक लक्ष रुपयाचा निधी भारतीय ऑलम्पिक संघटनेकडे पंतप्रधान रिलिफ फंड मध्ये जमा करण्यासाठी जमा केला असल्याचे राज्य तलवारबाजी संघटनेचे अध्यक्ष मा. श्री. अशोक दुधारे , सचिव डॉ. उदय डोंगरे व कोषाध्यक्ष राजकुमार सोमवंशी यांनी कळवले आहे. अशी माहिती सांगली जिल्हा तलवारबाजी संघटनेचे सचिव डॉ शुभम जाधव यांनी दिली.

Related Stories

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळवून देणार : आवळे

triratna

अन् प्रचाराच्या तोफा थंडावल्या

Patil_p

मराठय़ांच्या पाठीत खंजीर खुपसला!

triratna

सामाजिक कृतज्ञता पुरस्कार स्वर्गीय पी.डी. पाटील यांना जाहीर

Patil_p

रत्नागिरीत बुधवारपासून पुन्हा लॉकडाउन

triratna

महाराष्ट्र : मागील 24 तासात 161 पोलिसांना कोरोनाची बाधा

Rohan_P
error: Content is protected !!