तरुण भारत

गुटखा आणायला गेलेला खासबागचा तरुण बेपत्ता

प्रतिनिधी / बेळगाव

गुटखा आणण्यासाठी म्हणून घरातून दुकानाला गेलेला वर्धाप्पा गल्ली, खासबाग-शहापूर येथील एक तरुण गेल्या दहा दिवसांपासून बेपत्ता झाला आहे. यासंबंधी शहापूर पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

Advertisements

विजय मनोहर होसकेरी (वय 33) असे त्याचे नाव असून तो धारवाड येथील नव्या बसस्थानकाजवळ असलेल्या साई खानावळीत गेल्या सहा वर्षांपासून काम करतो. कोरोना संकटामुळे 20 मार्च रोजी तो बेळगावला आपल्या घरी आला होता.

24 मार्च रोजी सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास गुटखा आणण्याचे सांगून घरातून तो दुकानाला गेला होता. नंतर तो घरी परतला नाही. 4 फूट 10 इंच उंची, गोल चेहरा, अंगाने सुदृढ, सरळ नाक, गहू वर्ण असे त्याचे वर्णन आहे. या तरुणाविषयी कोणाला माहिती मिळाल्यास 0831-2405244 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Related Stories

ग्राहकांच्या विश्वासावरच लोकमान्य सोसायटीचे रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण

Patil_p

हेस्कॉमच्या कारभारामध्ये सुधारणा करा

Patil_p

रेल्वेत मोबाईल चोरणाऱया दोघा जणांना अटक

Patil_p

सराफ गल्लीत आनंदोत्सव

Patil_p

ऐश्वर्या हिट्टणगी यांना पीएचडी प्रदान

Amit Kulkarni

सिमेंट व्यापारी ते केंद्रीयमंत्री

tarunbharat
error: Content is protected !!