तरुण भारत

लॉकडाऊनमध्ये टेडिंग कसे करायचे?

गेल्या आठवडय़ात शेअरबाजारातील घसरण सुरूच राहिली आणि निफ्टी 8100 च्या खाली आला तर सेन्सेक्सही 28 हजारच्या खाली आला. येता आठवडाही लॉकडाऊनचा असल्याने त्याच वातावरणात शेअरबाजारातील व्यवहार होतील. लॉकडाऊनमुळे देशातील आर्थिक उलाढाली जवळजवळ ठप्प आहेत आणि शेअरबाजारातही घसरणीमुळे गुंतवणुकीसाठी लोक कचरत आहेत. लॉकडाऊनच्या काळात शेअरबाजारात टेडिंग कसे करायचे, हाच प्रश्न मोठा आहे.

कोरोना विषाणूचा फैलाव आटोक्मयात येण्याची चिन्हे नाहीत. जगाच्या तुलनेत भारतात कोरोना रुग्णांची संख्या कमी असली तरी दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे आणि ही बाब चिंताजनक आहे. लॉकडाऊन असूनही रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. अर्थात कोरोनामुळे निर्माण होणाऱया परिस्थितीचा मुकाबला करण्याची मानसिकता केवळ सरकारचीच नाही तर संपूर्ण देशाचीही तयार आहे, ही त्यातल्या त्यात सकारात्मक बाब आहे. लॉकडाऊनचा कालावधी संपल्यानंतर परिस्थिती कशी असेल याबाबत अजूनही स्पष्टता नाही. त्यामुळे कोरोना विषाणूचा कहर आटोक्मयात येणार की नाही यावर देशाची पुढील आर्थिक वाटचाल आणि शेअरबाजारांची चाल ठरणार आहे.

Advertisements

3 एप्रिल रोजी गेल्या आठवडय़ाच्या शेवटच्या दिवशी सततच्या विक्रीमुळे शेअरबाजाराची घसरणही चालूच राहिली. बँकिंग क्षेत्रात जोरदार विक्री झाली. त्याचबरोबर ऑटो, आयटी आणि मेटल्स स्टॉक्समध्येही जोरदार विक्री झाली. निफ्टी 8100 च्या खाली 8083 वर आणि सेन्सेक्स 27590 वर बंद झाले. सामान्य परिस्थितीत जागतिक स्तरावरही प्रचंड अनिश्चितता आहे. त्यामुळे भारतीय शेअरबाजारही अनिश्चिततेच्या गर्तेत आहे. अशावेळी गुंतवणूक करण्यापूर्वी थोडे थांबणेच इष्ट ठरेल.

गेल्या आठवडय़ात निफ्टीत 6.65 टक्के घसरण झाली आहे आणि येत्या आठवडय़ातही निफ्टीत मंदीच असेल असे संकेत मिळत आहेत. निफ्टी जवळजवळ 7800 पर्यंत खाली येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 7800 हा स्तर निफ्टीसाठी अत्यंत महत्त्वाचा असेल. त्याहीपेक्षा जर निफ्टी खाली गेला तर तो या वषीचा सर्वात निच्चांकी स्तर असेल यात शंका नाही. आगामी काही काळ शेअरबाजारात राहणारी ही अनिश्चितता पाहता गुंतवणूकदारांना अलिप्त राहून स्थैर्याची वाट पहावी असाच सल्ला देण्यात येत आहे. तांत्रिकदृष्टय़ा बोलायचे तर निफ्टीने 7800 चा स्तर टिकवण्याची आवश्यकता आहे. त्यापेक्षा तो खाली घसरला तर तो 7300 पर्यंत खाली जाऊ शकतो. पण 7800 चा स्तर कायम राखण्यात निफ्टीला यश आले तर नजीकच्या काळात 8600 पर्यंतचा स्तर त्याला गाठणे शक्मय होईल.

सध्याच्या परिस्थितीत कशा तऱहेने टेडिंग करायचे हाच मोठा प्रश्न आहे. शेअरबाजार अस्थिर तर आहेतच पण अनिश्चितही आहेत. आगामी काही काळ तरी ही अस्थिरता आणि अनिश्चितता कमी होईल असे वाटत नाही. म्हणूनच अत्यंत सावधानतेनेच गुंतवणूक करण्याचा सल्ला आहे. काही काळ थांबले तरी चालेल. घसरणीच्या काळात खरेदी करायचीच असेल तर शॉर्ट टर्म किंवा अल्पकालीन उद्दिष्ट ठेवू नका. किमान मध्यम कालावधीचे उद्दिष्ट ठेवा. पण दीर्घकालीन उद्दिष्ट ठेवून गुंतवणूक करणेच सध्याच्या काळात इष्ट ठरेल. किमान 15-20 सत्रांचे तरी उद्दिष्ट असायला हवे. सर्वात महत्वाचे म्हणजे सध्याच्या काळात स्टॉप लॉस लावायला विसरू नका.

दुसरी बाब म्हणजे संयम बाळगा. अनेकदा शेअरबाजारात एकदा घसरणीचे सत्र सुरू झाले की गुंतवणूकदारांचा धीर सुटतो आणि ते जे काही मिळेल ते पदरात पाडून घ्यायची घाई करतात. पण असे न करता आपल्या गुंतवणुकीवर विश्वास ठेवून संयमाने वागा आणि गुंतवणूक काढून घ्यायची घाई करू नका. गुंतवणुकीसाठी फंडामेंटल्स मजबूत असलेले स्टॉक्स निवडा. म्हणजे मंदीची ही स्थिती संपल्यावर हे स्टॉक्स तुम्हाला अपेक्षित परिणाम देऊ लागतील.

शेअरबाजारात एरवीही तेजीमंदीचा काळ सुरूच असतो. पण सध्याची परिस्थिती वेगळी आहे. कोरोना विषाणूमुळे संपूर्ण जगातच आर्थिक उलढाल ठप्प झाली आहे. यातून जग बाहेर कधी पडणार याचा अंदाज अद्याप कुणाला नाही. अगदी कोरोना विषाणूविषयीही शास्त्रज्ञ आणि डॉक्टर मंडळी अजूनही अनभिज्ञ आहेत. कोरोना विषाणूचा सध्याचा टप्पा जरी संपला तरी अर्थव्यवस्था सुरळीत व्हायला काही कालावधी जावा लागेल. संपूर्ण जगात सध्या अभूतपूर्व अशी आर्थिक मंदी आली आहे, असे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने म्हटले आहे. अशा काळात म्हणूनच धीर न सोडता संयमाने आणि सावधगिरी बाळगूनच गुंतवणूक करणे इष्ट ठरेल. या संकटाच्या काळात मानसिक संतुलन बिघडू न देणे आणि सकारात्मक दृष्टीकोन बाळगणे हाच यावर मात करण्याचा उपाय आहे. 2000 आणि 2008 मध्येही मोठी मंदी आली होती. पण त्यावर मात करण्यात यश आले होते. आताची परिस्थितीही लवकरात लवकर आटोक्मयात येईल, अशी अपेक्षा बाळगू या.

– संदीप पाटील,

शेअरबाजार अभ्यासक

Related Stories

जनतेला भागिदारी देण्यासाठी एलआयसी कायद्यात बदल होणार

Omkar B

देशातील तेल आणि गॅस उत्पादनात ओएनजीसीची हिस्सेदारी वाढली

Patil_p

एसीसी रेडिमिक्सचे नवे उत्पादन

Patil_p

प्रकल्पांच्या अर्थसहाय्यासाठी लवकरच नवी बँक

Patil_p

कोल इंडियाचे उत्पादन 3.4 टक्क्यांनी वाढले

Omkar B

परदेशात गुंतवणूक करताना…

Omkar B
error: Content is protected !!