तरुण भारत

आरोग्य संजीवनी विम्यामधून कोरोनावर उपचार : इरडा

1 एप्रिल रोजी पॉलिसीचे सादरीकरण : प्रीमीयमची सोय

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisements

जगासोबत देशातील कोरोना संर्सग होणाऱया रुग्णाची संख्या वेगाने वाढत आहे. याच कालावधीत विविध उद्योगपत्ती आणि दानशूरांकडून कोरोनाशी लढा देण्यासाठी आर्थिक सहाय्यता देण्यात येत आहे. तसेच आज एक दिलासादायक बातमी समोर आली आहे, ती म्हणजे इशुरन्स रेग्युलेटरी(इरडा) यांच्याकडून आरोग्य संजीवनीच्या माध्यमातून कोरोनावर उपचार करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. या सुविधेमधून आता संबंधीतांना उपचार घेता येणार आहे.

आरोग्य संजीवनीकडून एका विशिष्ट आराखडय़ाची रचना इरडाने केली आहे. या आरोग्य प्लॅनच्या माध्यमातून 29 जनरल आणि हेल्थ इन्शुरन्स कंपन्या अमंलबजावणी करत आहेत. या विशिष्ट विमा पॉलिसीचे सादरीकरण 1 एप्रिल 2020 मध्ये करण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत 1 ते 5 लाखापर्यंत बेसिक आरोग्य संरक्षण दिले होते. प्रत्येक लाखाच्या विमा संरक्षणावर प्रीमीयम शुल्क 1 हजार रुपयाच्या आसपास आकारण्यात येणार असल्याचेही सांगितले आहे.

सरकारी रुग्णालयात मोफत उपचार

इरडाकडून सरकारी रुग्णालयात कोरोनावर उपचार करण्यात येत असल्याचे सांगितले आहे. तर दुसऱया बाजूला खासगी रुग्णालयात उपचारही सध्या सुरु करण्यात आले आहेत. तरी काही अहवालाच्या आधारे कोरोना रुग्णाच्या उपचारासाठी जवळपास 15 लाखापर्यंत खासगी रुग्णालय शुल्क आकारत असल्यचे समोर आले आहे.

Related Stories

जिओ दूरसंचार क्षेत्रात देशात चमकणार

Patil_p

लेनोवोचा 7 आय स्लिम लॅपटॉप दाखल

Patil_p

दहा वर्षांमध्ये अमूलाचा व्यवसाय पाच पटीने वाढून 52 हजार कोटींच्या घरात

Omkar B

‘इंडियन ऑईल’ने उत्पादन क्षमता वाढविली

Patil_p

बजाज चेतकचे बुकिंग पुन्हा सुरू

Patil_p

एसबीआयने वाढवले व्याजदर

Patil_p
error: Content is protected !!