तरुण भारत

ऍपलचा स्वस्त स्मार्टफोन लवकरच

येत्या 15 एप्रिल रोजी ऑनलाईन सादरीकरण

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisements

जगातील दिग्गज आयफोन निर्मिती करणारी कंपनी ऍपल लवकरच एक स्वस्त किंमतीचा स्मार्टफोन बाजारात आणणार आहे. आयफोन9 हे मॉडेल येत्या 15 एप्रिल 2020 रोजी सादर करणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. कोरोनाच्या विळख्यात कंपनीने सादरीकरणाचा कार्यक्रम न लांबविता तो नियोजित वेळेत करण्यासाठी या स्मार्टफोनचे सादरीकरण ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. तर 22 एप्रिलनंतर यांची विक्री सुरु होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

मीडिया अहवालाने केलेल्या दाव्यानुसार आयफोन 9 या मॉडेलसोबत कंपनी 5.5 इंच डिस्प्ले असणरा आयफोन9 प्लसचेही सादरीकरण करण्याच्या तयारीत आहे. या स्मार्टफोनचे नाव आयफोन एसइ2 असणार आहे. ऍपलच्या माहितीनुसार स्मार्टफोन अफोर्डेबल सेगमेंट असणार आहे. हा सर्वात स्वस्त आयफोन असल्याचा दावा कंपनीने केला आहे. ऍपलच्या या नवीन स्मार्टफोनची किमत 399 डॉलर म्हणजे जवळपास 29 हजार रुपये असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. फोनमध्ये 64 जीबी स्टोरेज आणि 128 जीबी, 256 जीबीचे स्टोरेज मिळणार असल्याचे सांगितले आहे. 

Related Stories

शाओमीचा रोबोट व्हॅक्मयुम क्लीनर सादर

Patil_p

एलजी मोबाईल उद्योगातून बाहेर

Amit Kulkarni

असूस आरओजी फोन 5 लाँच

Patil_p

आता गुगलचं टँगी ऍप

Omkar B

‘लावा’चा पहिलावहिला 5 जी मोबाईल दाखल

Patil_p

मोटो जी 30 व 10 पॉवर आज होणार लाँच

Patil_p
error: Content is protected !!