तरुण भारत

युद्धजन्य स्थितीत ‘मुंबई’ काठावर पास

मुंबईसारख्या शहरातील वाढणारी कोरोनाची रुग्णसंख्या चिंताजनक बाब असून एकूणच आपण सर्व यात नापास होतोय की काय असा सवाल उपस्थित होत आहे. त्यात समाधानाची बाब म्हणजे अद्यापही काठावर असून पूर्ण पास होण्यास अधिक संधी आहे…

लॉकडाऊन कधी उघडणार असा प्रश्न सर्वसामान्य मुंबईकरांमध्ये उपस्थित केला जात आहे. मात्र त्याच वेळी मुंबईसारख्या शहरातील वाढणारी कोरोनाची रुग्णसंख्या चिंताजनक बाब असल्याचे स्पष्ट होत आहे. या टप्प्यापर्यंत पोहचण्यास पोषक कारणांचा विचारही प्रत्येकाने गांभीर्याने करणे आवश्यक आहे. सध्या नोव्हेल कोरोनामुळे सुरू झालेली स्थिती ही जैविक युद्धाची नांदी आहे. यातून सर्वच जग बोध घेत आहे. कोणाच्या लगेचच पचनी पडत आहे, तर कोणाला उशिराने समजत आहे. कोव्हिड 19 च्या चपाटय़ात भारत इतर देशांच्या तुलनेत दोन आठवडे उशिराने आला. पुढच्यास ठेच मागचा शहाणा या म्हणीप्रमाणे आपल्या समोर ठेचाळलेल्या? देशांचा अनुभव तरी होता. कोव्हिड19 चा संसर्ग टाळण्याच्या ज्या उद्देशाने लॉक डाऊन सुरु केले त्या उद्देशाचा टप्पा गाठण्यासाठी उशीर होत आहे. विशेषत: मुंबईसारख्या शहरातील वाढणारी रुग्ण संख्या चिंताजनक बाब असून एकूणच आपण सर्व यात नापास होतो की काय असा सवाल उपस्थित होत आहे. कोरोना? विषाणू भारतीयांनाच नव्हे तर संपूर्ण जगाला नवा आहे. हे जैविक युद्ध मानल्यास अशा युद्धप्रसंगी कसे सामोरे जावे याचे नियोजन अगदी अमेरिकेकडेही नसल्याचे तेथील शहरांमधील मृत्यूच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. स्वच्छतेचे कडक पालन करणारी, सार्वजनिक शिस्त पाळणारी, सुबत्ता असणारी जगभरातील शहरे कोव्हिडच्या चपाटय़ात आली. येथील मृत्यू संख्या पाहिल्यास काहीही कोणाचाही दोष नसताना जीवन गमावणारे अधिक असल्याचे दिसून? येईल. तुलनेने आपल्याकडे मृत्यूची संख्या अजूनही नियंत्रणात आहे. याचे श्रेय आयत्या वेळी उपलब्ध साधनांसह झुंज देणाऱया सरकारी यंत्रणेला नक्की द्यावे लागेल. सरकारी यंत्रणेतील कुटुंबकबिल्यासह राहणारी माणसेच आहेत याचा विसर मात्र आपल्याला होत आहे. सध्या कोव्हिडचा संसर्ग टाळण्यासाठी क्वारंटाईन, सोशल डिस्टन्सिंग, कंटेनमेंट झोन, बफरझोन सारखे अप्रचलित शब्द मुंबईकरांच्या कानावर पडत आहेत. या सर्व उपाययोजनांची मार्गदर्शक तत्त्वे जागतिक आरोग्य संघटना ठरवत आहे. या मार्गदर्शक तत्वांचा अवलंब जगभरातील त्या त्या प्रदेशांनी तेथील उपलब्ध स्थिती व साधनांसह पालन करणे असा होतो. मुंबईसारख्या शहरात स्कायलाईन व्यापून टाकणाऱया इमारती जशा आहेत. तशाच 10 बाय 10 च्या खोलीत राहणारे मुंबईकरही आहेत. आता समूह संसर्गाच्या उंबरठय़ावर असताना एखाद्या मुंबईकराला होम क्वारंटाईन सुचवल्यास हे होम क्वारंटाईन मार्गदर्शक तत्वानुसार पाळणे अशक्मयप्रायच आहे. कारण किमान चौकोनी कुटुंब सदस्य जरी धरली तरीही 10 बाय 10 च्या खोलीत मार्गदर्शक तत्वानुसार होम क्वारंटाईनचे नियम पाळणे अशक्मय असल्याचे समोर येईल. यासाठी सरकारने रिकाम्या इमारती ताब्यात घेऊन क्वारंटाईन होम उभारली आहेत. सुचवलेल्या क्वारंटाईन ठिकाणी राहण्याची मानसिकताच सध्या लोकांमध्ये दिसून येत नाही. जे? परदेशी प्रवासी मुंबईत आले,? त्यांना प्राथमिक आरोग्य तपासणी करुन होम क्वारंटाईन होण्यास सुचवले होते,? यातील काही जण त्या त्या स्थानिक वस्तीत खुलेआम फिरत असल्याच्या तक्रारी सुरुवातीला प्राप्त होत होत्या. त्यांना होम क्वारंटाईनचा गर्भित धोकाच समजला नव्हता. तर आकडेवारीनुसार 21 ते 41 वयोगटातील रुग्णसंख्या सर्वाधिक असल्याची नोंद होत? आहे. याचा अर्थ लॉकडाऊनमध्येही मुक्तसंचार करणारा हा वयोगट सर्वाधिक आहे.

Advertisements

संचारबंदी सुरू करण्यास सार्वजनिक आरोग्यास धोका पोहचू नये हे प्रमुख कारण आहे. मात्र या संचारबंदीचे मुंबईसारख्या शहरात तीन तेरा वाजवण्यात आले. सार्वजनिक रुग्णालयांमध्ये आवश्यक असल्यासच या, रुग्णालयात संबंधित भागातच तपासणीसाठी जा,  सार्वजनिक रुग्णालयांमधील अशा अनेक सूचनांची पायमल्ली करण्यात आली. हे लॉकडाऊन अत्यावश्यक सेवांना लागू नाही. त्यासाठी धान्यांची, भाज्यांची दुकाने ठरावीक वेळेत सुरू ठेवली. सोशल डिस्टन्सिगच्या नियम पालनासाठी पालिकेच्या कर्मचाऱयांनीही रस्त्यावर उतरून दुकानांसमोर एक मीटर अंतरावर रिंगण आखली. मात्र ही रिंगण गर्दीच्या पायाखालीच अधिक चिरडली गेली. लॉकडाऊन म्हणजे? पुढील काळात खाण्या-पिण्याचे? वांधे होणार या गैरसमजामधून आजही बाजारांमधील गर्दी कमी होताना दिसत नाही. यातून संसर्ग वाढत आहे. 

एकूणच अशा कठीण स्थितीत प्रत्येकाला काही तरी करून दाखवण्याची उर्मी आहे. ही उर्मी समाजहितासाठी वापरावी. मुंबईसारख्या राज्यातील इतरही शहरांसाठी परीक्षेचा काळ आहे. यात काठावर पास होऊन कोरोनाचा संसर्ग समाजात कायम ठेवणे की लॉकडाऊन पूर्ण पाळून संसर्गाची साखळी तोडणे केवळ आपल्या? आणि आपल्याच हातात आहे. मुंबईसारखे? आर्थिक राजधानीचे शहर अधिक काळ लॉकडाऊन राहिल्यास अधिक चिंतेची बाब ठरेल. कारण लॉकडाऊनपेक्षा आर्थिक टाळेबंदी मुंबईकरांना किंबहुना राज्याला अधिक चिंतेची बाब ठरेल. किमान एक लॉकडाऊन नियमा नुसार पाळल्यास मुंबई शहराला लवकरात लवकर मुक्त होणे शक्मय होईल.

राम खांदारे

Related Stories

स्वामी

Patil_p

खरंच साधू गांजा पितात?

Patil_p

आपण सारेच पोटार्थी !

Amit Kulkarni

वर्षाभरानंतरही राजकीय गूढ कायम!

Patil_p

त्रिरत्नांचा सन्मान

Patil_p

आपणावरून दुसऱयाला! राखत जावे!!

Patil_p
error: Content is protected !!