तरुण भारत

वॉव

लॉकडाऊनमध्ये मी एका तरुण मित्राशी फोनवर चॅटिंग करून माझ्या शंकांचे  निरसन करून घेत होतो.

“टीव्हीवर खाद्यपदार्थांच्या कार्यक्रमात पाहुणीने बनवलेला पदार्थ तोंडात टाकल्यावर तो अँकर नेहमी वॉव असं का म्हणतो? मराठीत का बोलत नाही?’’

Advertisements

“वॉव हा नवमराठीतला शब्द आहे. त्याला दुसरा पर्याय नाही. तुम्ही लोक गाणं ऐकायला जाता तेव्हा गवयानं चांगली जागा घेतली की तुम्ही म्हणता-क्मया बात है. तुम्ही असं नाही म्हणत की हे फार श्रवणीय झालं.’’

“बरोबर आहे तुझं. हे फार श्रवणीय झालं असं आम्ही म्हणालो असतो तर खाद्यपदार्थ आवडल्यावर-’’

“हे फार भक्षणीय झालं!’’ दोघांनी एकाच वेळी हे वाक्मय टाईप केलं. दोघे हसलो. म्हणजे हसण्याची इमोजी टाकली. मग मी विचारलं, “पण काय रे? एखादी गोष्ट वॉवपेक्षा जास्त आवडली तर तुम्ही काय म्हणता? आम्ही पूर्वी गुड, गुडर आणि गुडेस्ट म्हणायचो. किंवा मग भारी, लई भारी आणि लई म्हणजे लईच भारी असं म्हणायचो.’’

“त्याला नियम असा नाही. माझ्यापुरतं मी वॉव, ऑसम आणि अमेझिंग असं बोलतो.’’

“पण आता तू म्हणतोस की वॉव हा नवमराठीतला शब्द आहे. मग वॉव, वॉवतर आणि वॉवतम असं काही नाही म्हणत? व्याकरणाच्या नियमात पण ते फिट्ट बसेल.’’

“काका, तुम्ही बेसिक गोष्ट समजून घ्या. कोणती पण भाषा व्याकरणाचे शिक्षक बनवू शकत नाहीत. आधी लोक एकमेकांशी बोलतात, भाषा बनवतात. मग शिक्षक लोकं त्याचे नियम लिहून काढतात. आधी भाषा, मग व्याकरण.’’ “बरोबर आहे रे बाबा तुझं. आता आमच्यानंतर तुम्ही लोकंच मराठी भाषा वापरणार, सांभाळणार. तेव्हा तुमच्या मर्जीने होऊन जाऊ देत.’’ “काका, एक कल्पना सांगतो. इंग्लिश लोक स्वतःच्या आणि इतरांच्या बोली-लेखी वापरातले शब्द स्वीकारतात आणि त्यांची भाषा कसली समृद्ध झालीय. मग आपण पण लोकं, लोक्ससारखे शब्द सन्मानपूर्वक स्वीकारायला काय हरकत आहे? रिक्षाच्या पाठीवर ‘आर्शिर्वाद’, ‘आशिर्वाद’ लिहिलेलं दिसलं की तुमच्या पिढीचं पित्त खवळतं. त्यापेक्षा हे दोन्ही शब्द मराठी शब्दकोशात ऑफिशियली स्वीकारले तर तुम्हाला होणारा मनस्ताप टळेल. काय म्हणता?’’

“वॉव, ऑसम, अमेझिंग, तू रॉक्स आणि मी शॉक्स!’’

दोघांनी आधी हसण्याची आणि मग टाळीची इमोजी टाकली आणि ऑफलाईन झालो.

Related Stories

ब्रेक्झिटचे घोडे अखेर ऍटलांटिक समुद्रात न्हाले

Patil_p

माध्यमे आणि भ्रष्टाचार

Patil_p

चढ-उताराच्या प्रवासात बाजार घसरला

Patil_p

जोडा विघडला बंधूंचा

Patil_p

बैठकीचे फलित काय?

Amit Kulkarni

कवी आणि पुढारी

Patil_p
error: Content is protected !!