तरुण भारत

‘ऑगस्टा’मधील आरोपीच्या जामिनावरील निर्णय सुरक्षित

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळय़ातील संशयित आरोपी के. मिशल यांच्या अंतरिम जामीनावरील निर्णय उच्च न्यायालयाने सोमवारी सुरक्षित ठेवला. आरोग्य आणि वयाचा विचार करून अंतरिम जामीन देण्यात यावा, अशी मागणी त्याने केली आहे. सध्या सीबीआय आणि ईडीने या दोन्ही संस्था त्याच्याकडे चौकशी करीत आहेत. मिशलचे वय 59 वर्ष आहे. सध्या देशभरात कोरोना विषाणूच्या संसर्गाचा धोका आहे. आरोग्याचा विचार करून त्याला अंतरिम जामीन मंजूर करावा, असे मिशेलचे वकील अल्जो यांनी याचिकेमध्ये म्हटले आहे. अटक केल्यापासून मिशेलने तपास संस्थांना सहकार्य केले आहे. मिशेल याचे मागील वर्षी दुबईतून प्रत्यार्पण करण्यात आले होते. ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदीमध्ये तो मुख्य दलाल होता, असा आरोप आहे. सध्या तो तिहार कारागृहात आहे.

Related Stories

ईशान्य भारतात 4 दिवसांत रुग्णसंख्या दुप्पट

Patil_p

रशियातील बहुपक्षीय लष्करी कवायतींमध्ये भारताचा सहभाग नाही

datta jadhav

पंजाबमध्ये कोरोनामुळे दोन जणांचा मृत्यू, 82 नवे रुग्ण 

pradnya p

राजस्थान : दुसरे लग्न करण्यास नकार दिल्याने सासू सासर्‍यांनी कापले सुनेची जीभ व नाक

pradnya p

जम्मू काश्मीरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 15 हजारांच्या उंबरठ्यावर

pradnya p

सोनिया गांधींवर कर्नाटकात गुन्हा दाखल

datta jadhav
error: Content is protected !!