तरुण भारत

राज्यात 12 जणांना कोरोनाचा संसर्ग

प्रतिनिधी/ बेंगळूर

कोरोनाचा कहर वाढतच असून सोमवारी राज्यात 12 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्णांची संख्या 163 वर पोहोचली आहे. चिंतेची बाब म्हणजे म्हैसूर जिल्हय़ात 7 रुग्ण आढळून आले असून ते सर्वजण एकाच फार्मा कंपनीत कामगार आहेत. नंजनगूड या कंपनीतील एका कामगारामुळे 14 पेक्षा अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. या कंपनीतील 800 जण सध्या क्वारंटाईनमध्ये असून या सर्वांचे रक्त आणि स्वॅब तपासणीसाठी पाठवून देण्यात आले आहे.

Advertisements

सोमवारी म्हैसूरमध्ये 7, बेंगळूरमध्ये 2, बागलकोटमध्ये 2 आणि बेंगळूर ग्रामीण जिल्हय़ात 1 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. बेंगळूरमध्ये दाम्पत्यामुळे त्यांच्या 32 वर्षीय मुलाला कोरोनाची लागण झाली आहे. तर जर्मनीहून बेंगळूरला परतलेल्या मुळच्या केरळमधील 62 वर्षीय महिलेला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. या दोघांवर व्हिक्टोरिया इस्पितळात उपचार करण्यात येत आहेत. तर बेंगळूर ग्रामीण जिल्हय़ात दिल्लीतील तबलिग जमातच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या 43 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची बाधा झाली आहे. म्हैसूरमध्ये 7 पैकी तिघे पॉझिटिव्ह रुग्ण तबलिग जमातच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते, अशी माहिती पुढे आली आहे.

म्हैसूरमध्ये फार्मा कंपनी ठरणार जीवघेणी?

बेंगळूरनंतर राज्यात म्हैसूरमध्ये सर्वाधिक 35 कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. म्हैसूरमधील ज्युबिलियंट फार्मा कंपनीला चीनमधून कच्चा माल पुरवठा होतो. मार्च महिन्यात तेथून कंटेनरने कच्चा माल पाठविण्यात आला होता. त्यामधील पाकिटांवरील कोरोना विषाणूचा संसर्ग कामगारांना झाला असावा, असा संशय आहे. दुसरीकडे या कंपनीतील कर्मचाऱयाचा एक मित्र ऑस्ट्रेलियामधून परतला होता. त्याच्यामुळे इतर कर्मचाऱयांना संसर्ग झाल्याचे सांगण्यात येते. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी आयएएस अधिकाऱयाची नेमणूक करण्यात आली आहे.

ज्युबिलियंट कंपनीत 1 हजार कर्मचारी असून त्यापैकी 900 जणांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यापैकी 100 जणांना क्वारंटाईनमुक्त करण्यात आले आहे. उर्वरित 800 जणांचे स्वॅब आणि रक्त प्रयोगशाळेकडे पाठवून देण्यात आले आहेत. एका कर्मचाऱयामुळे म्हैसूरमध्ये मोठय़ा प्रमाणात कोरोनाचा प्रादूर्भाव होण्याची भीती कर्मचारी व प्रशासनाला आहे.

बागलकोटमध्ये आणखी दोघांची भर

बागलकोटमध्येही सोमवारी दोन रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे या जिल्हय़ातील रुग्णांची संख्या 3 झाली आहे. चार दिवसांपूर्वी येथील 75 वर्षीय  वृद्धाला कोरोनाची लागण झाली होती. दुसऱयाच दिवशी त्याचा मृत्यू झाला होता. आता त्याची 56 वर्षीय पत्नी आणि 58 वर्षीय भावाला कोरानाची लागण झाली आहे. या दोघांवर जिल्हा इस्पितळात उपचार करण्यात येत आहे.

 20 जण संसर्गमुक्त

 राज्यात आतापर्यंत 20 जण संसर्गमुक्त झाले आहेत. आणखी एक समाधानाची बाब म्हणजे सोमवारी एकाच दिवशी 8 जण कोरोनापासून बरे झाले आहेत. त्यांना डिस्चार्ज देण्यात आला असून पुढील सूचनेपर्यंत होम क्वारंटाईनमध्ये राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. बेंगळूरमध्ये 15 जण, मंगळूरमध्ये मुळचा भटकळमधील एक व्यक्ती, दावणरेगेत 2 गुलबर्ग्यात एकाला संसर्गमुक्त झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला आहे.

Related Stories

उत्तराखंडमध्ये साकारतेय औषधी उद्यान

Patil_p

भारतीय गायकाला ओबामांची पसंती

Patil_p

लेकसिटीत पोहोचली जान्हवी कपूर

Patil_p

लसीकरण प्रमाणपत्रावरील मोदींचे छायाचित्र हटवा !

Patil_p

सिलिंडर दरात 25 रुपये वाढ

Amit Kulkarni

”अनिल देशमुखांच्या राजीनाम्याचा निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना”

Shankar_P
error: Content is protected !!