तरुण भारत

ह्यांना काय जिल्हाधिकायांनी वेगळा नियम लावलाय का?

प्रतिनिधी/ सातारा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 90 टक्के सातारा शहर लॉकडाऊन झाले असताना अनंत इंग्लिश चौक विठोबाचा नळ या दरम्यान काही विक्रेते नियम डावलून रस्त्यावर विक्री करताना दिसत आहेत. त्यांच्यासाठी जिल्हाधिकाऱयांनी काय वेगळा नियम काढला आहे का?, असा सवाल संतप्त सातारकर विचारू लागले आहेत.

Advertisements

कोरोनाला साताऱयात थारा द्यायचा नाही म्हणून सातारा शहरात लॉकडाऊन केले आहे. अगदी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या सूचनांचे तंतोतंत पालन सातारा पालिका व पोलीस करत आहेत. पोलिसांनी तर सुरुवातीला दंडुका वापरला नंतर गुन्हे दाखल करायला सुरुवात केली. तरीही अजून काही नागरिकाना त्याची जाणीव नाही. याचाच प्रत्यय सातारा शहरात राजवाडा ते मंगळवार तळे रोडवर दररोज सायंकाळी दिसू लागला आहे. बंद असून ही काही विक्रेते हातगाडय़ावर आपला माल विकताना दिसत आहेत. ना सोशल डिस्टन्स ना नियम पाळताना हे विक्रेते दिसत असून त्यांना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी काय वेगळा निकष लावला काय?, असा सवाल त्या परिसरातील स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे. अशा लोकांवर का कारवाई केली जात नाही, की त्यांना पालिकेने रस्त्यात हातगाडी लावून गर्दी करण्याचा परवाना दिला आहे का?, असा ही सूर स्थानिक नागरिकांमधून उमटला जात आहे.

Related Stories

समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन रूजविणे काळाची गरज

datta jadhav

शहरातील लॉज वर पोलीसांचा वॉच वाढणार कधी ?

Patil_p

पालिकेची ती टीम सदैव तत्पर

Patil_p

एका मिनिटांत मारले 100 पुशअप्स

Patil_p

साताऱयात जुन्या वादातून युवकाचा निर्घृण खून

Omkar B

सातारा जिल्ह्यात 384 नागरिकांना दिला डिस्चार्ज

Abhijeet Shinde
error: Content is protected !!