तरुण भारत

आयर्लंडचे पंतप्रधान रुग्ण सेवेसाठी पुन्हा एकदा डॉक्टरी पेशात

ऑनलाईन टीम / लंडन : 

कोरोना विरोधातील लढाईत आता आयर्लंडचे पंतप्रधान लिओ वराडकर स्वतः मैदानात उतरणार आहेत. पेशाने डॉक्टर असलेल्या वराडकर यांनी रुग्णसेवेसाठी पुन्हा एकदा आपली नोंदणी केली आहे.वराडकर यांच्या प्रवक्त्याने याबाबतची माहिती दिली आहे.

Advertisements

वराडकर हे राजकारणात येण्यापूर्वी पेशाने डॉक्टर होते. आयर्लंडमध्ये कोरोनाचे संकट अधिक गडद होत चालल्याने आणि आरोग्य सेवकांची कमतरता भासत असल्याने वराडकर यांनी पुन्हा रुग्णसेवा करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी संबंधित आरोग्य विभागाकडे नोंदणीही केली आहे. पंतप्रधान वराडकर यांच्या कुटुंबीयातील सदस्य आणि मित्र आरोग्य क्षेत्रात काम करत आहेत. त्याशिवाय स्वत: पंतप्रधान करोनाच्या महासंकटात प्रत्यक्ष मदत करण्यासाठी उत्सुक आहेत. वराडकर हे आठवड्यातील काही दिवस रुग्णसेवेसाठी देणार असल्याचे त्यांच्या प्रवक्त्याने सांगितले.

Related Stories

मुंबई : कांदिवली स्टेशनजवळ रेल्वेची ट्रकला धडक

Rohan_P

धास्तवलेले जग

Amit Kulkarni

राहुल गांधींच्या ‘ब्रेकफास्ट मीटिंग’मध्ये संसदेत सरकारला घेरण्याची तयारी सुरु?

Abhijeet Shinde

कोरोना संसर्गामुळे डोनाल्ड ट्रम्प अत्यवस्थ

Patil_p

रत्नागिरी जिल्ह्यात आज 13 कोरोना पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊनची गरज, मुख्यमंत्री घोषणा करणार- राजेश टोपे

Abhijeet Shinde
error: Content is protected !!