तरुण भारत

‘बच्चे कंपनी’ रमली स्वयंपाकघरात

मुले करतात आईला  घरकाम शिकण्यासही सुट्टीची मदत अभ्यासाचीही नाही धास्ती मदत

च्चे कंपनीला जाम भूक लागली की फक्त स्वयंपाकघरात ती डोकावतात. उर्वरित वेळ खेळात किंवा अभ्यासात घालवितात. घरकामात कोणी सहसा लक्ष घालत नाही. पण, ‘कोरोनो व्हायरस’मुळे सध्या बच्चे कंपनीला घरातून बाहेर पडता येत नाही. ‘लॉकडाऊन’मुळे घरातील कामवालीबाई नेहमीप्रमाणे कामावर येऊ शकत नाही. ती घरातच बंदिस्त आहेत. अशावेळी बच्चे कंपनी आपल्या आईला मदतीचा हात देऊ लागलीत. त्यातून आईलाही मोठा दिलासा मिळू लागला आहे. अभ्यासाचीही नाही धास्ती ‘कोरोना व्हायरस’मुळे ‘लॉकडाऊन’ करण्यात आल्याने मुलांच्या परीक्षा देखील रद्द झाल्या. त्यामुळे अभ्यासाची चिंता नाही. परीक्षेच्या निकालाचीही चिंता नाही. पहिली ते आठवीपर्यंत सर्वांचा निकाल, सर्वांना ठाऊक. प्रश्न राहिला तो इयत्ता नववीच्या व अकरावीच्या मुलांचा. त्यांचा निकाल वर्षभराच्या कामगिरीवर अवलंबून. मुले करतात आईला मदत मुलांना घरातून बाहेर पडता येईना. मामाच्या गावालाही जाता येईना. जो वेळ मिळतो, तो घरातच घालवायचा. थोडा वेळ टीव्हीवरील कार्यक्रम पाहण्यासाठी तर थोडा मोबाईलवर गेम्स खेळण्यात. भूक लागली की, किचनमध्ये डोकावण्यात. याचवेळी आईचे फर्मान निघते की, किचनमध्ये काही तरी मदत केली तर लवकर खाऊची व्यवस्था होईल. किचनमध्ये कामवालीबाई नाही व खाऊ तर लवकर मिळायला हवा. मग मुलेही आपल्यापरिने शक्य ती मदत करण्यासाठी पुढे सरसावतात. मुले बनवितात खाद्यपदार्थ सुरुवातीला आईला थोडी मदत म्हणून पुढे सरसावलेली मुले आता बऱयापैकी स्वयंपाकघरात रमू लागली. कुडचडे येथील श्री सरस्वती प्राथमिक विद्यालयात चौथीच्या वर्गात शिकणारा दहा वर्षांचा विद्यार्थी आयुर्षांची कैरा लोटलीकर ‘वॉशिंग मशिन’मध्ये स्वतःचे तसेच इतरांचे कपडे धुण्यात तसेच स्वयंपाकघरातील सर्व भांडी रॅकमध्ये व्यवस्थित ठेवण्यात तरबेज झाली आहे. मडगावच्या मनोविकास हायस्कूलची सात वर्षाची विद्यार्थिनी छावी सचिन वेर्लेकर ही गॅस बॅर्नरची सफाई, स्वयंपाकघरात स्वच्छता या कामात आईला मदत करते. या छोटय़ा-छोटय़ा कामातून दिवस-रात्र किचनमध्ये राबणाऱया आईला सध्या दिलासा मिळत आहे.

Advertisements

प्रतिनिधी / अँकर, मडगाव

Related Stories

आरंभ प्रवेश पर्वाचा

tarunbharat

ही काळजी जरूर घ्या

tarunbharat

आंध्रातील वांगी करी

Patil_p

सरकारी शाळा क्र. 45 नार्वेकर गल्ली

Patil_p

कर्जबाजारी बनवणारी लक्ष्मी यात्रा

tarunbharat

अन्नोत्सवाची पर्वणी

Patil_p
error: Content is protected !!