तरुण भारत

नवे खेळाडू राष्ट्रीय संघाशी प्रतारणा करतात

पाकिस्तानचा गोलंदाजी प्रशिक्षक वकार युनूसची टीका, क्लब क्रिकेटला प्राधान्य देणाऱया गोलंदाजांचा समाचार

वृत्तसंस्था/ कराची

Advertisements

टी-20 क्रिकेट लीग स्पर्धेचे नवे पीक सुरु झाल्यानंतर त्यातून उत्तम पैसेही मिळू लागले आहेत. पण, या मोहात पडत अनेक क्रिकेटपटू आपल्या राष्ट्रीय संघाशी प्रतारणा करत आहेत, अशी टीका पाकिस्तानचा गोलंदाजी प्रशिक्षक वकार युनूसने केली. मोहम्मद आमीर व वहाब रियाज यांनी गतवर्षी अशाच प्रकारे पाकिस्तानी संघाऐवजी टी-20 क्लब संघातून खेळण्याचा निर्णय घेतला आणि यामुळे पाकिस्तानच्या राष्ट्रीय संघाला फटके बसले होते. त्या पार्श्वभूमीवर वकार युनूस बोलत होता. आमीर व रियाज यांच्यापैकी आमीरने तर 27 व्या वर्षीच पाकिस्तान राष्ट्रीय संघाला रामराम ठोकण्याचा घेतलेला निर्णय पीसीबीसाठी आश्चर्यकारक ठरला होता.

‘आधुनिक क्रिकेटमधील खेळाडूंना, विशेषतः गोलंदाजांना टी-20 लीगचा अधिक मोह आहे. कारण, त्यात फक्त 4 षटकेच टाकावी लागतात आणि त्या तुलनेत मिळणाऱया पैशाचे मोल बरेच अधिक असते. पण, या प्रक्रियेत राष्ट्रीय संघाला त्याचा कसा फटका बसतो, याचा विचार हे खेळाडू करत नाहीत. माझ्या दृष्टीने हे खेळाडू सारासार विचार करत नाहीत’, असे वकार युनूस पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाला.

एकांगी निर्णय पद्धतीवर टीका

आमीर व वहाब यांनी ज्या एकांगी पद्धतीने आपला निर्णय जाहीर केला, त्यावर देखील वकार युनूसने जोरदार टीका केली. ‘जर तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या निर्णयाची घोषणा करत असाल तर ते खूपच वाईट आहे. खरे तर त्यांनी सर्वप्रथम त्यांच्या व्यवस्थापनाला आपल्या निर्णयाची माहिती द्यायला हवी. त्यांनी सर्वप्रथम मंडळाशी चर्चा करायला हवी. पण, असे होताना दिसून येत नाही आणि त्याची झळ आम्हाला सोसावी लागते,’ असे तो पुढे म्हणाला. 

‘आमीर व वहाब यांनी यापुढेही पाकिस्तानच्या कसोटी संघात निवड झाली तर खेळत रहायला हवे. एखाद्या खेळाडूने कसोटी क्रिकेट खेळणार नाही, असे ठरवले तर त्याबाबत मंडळाची, कार्यकारिणीची ध्येयधोरणे काय आहेत, याची कल्पना मुख्य प्रशिक्षक व मुख्य निवडकर्ते मिसबाह-उल-हकने खेळाडूंना दिलेली आहे’, याचा वकारने येथे उल्लेख केला. आघाडीचा आणखी एक गोलंदाज हसन अली मागील विश्वचषक स्पर्धेनंतर दुखापतीमुळे खेळू शकत नसल्याचे येथे स्पष्ट केले. पाकिस्तानचा माजी गोलंदाजी प्रशिक्षक अझहर मेहमूदने हसनने जिममध्ये प्रमाणापेक्षा अधिक वजनी व्यायामावर भर दिल्याने त्याची दुखापत चिघळली असल्याची माहिती दिली.

वकारने मात्र यात फारसे तथ्य नसल्याचा दावा केला. ‘अझहरला इंग्लंडमध्ये बसून याचा शोध कसा लागतो, याची मला कल्पना नाही. पण, जलद गोलंदाजासाठी दुखापती हा अविभाज्य घटक असतो. यातूनही त्यांना मार्ग शोधावा लागतो. हसन अली पाकिस्तान क्रिकेटसाठी महत्त्वाचा सदस्य असून लवकरच तो पुनरागमन करेल, अशी अपेक्षा आहे’, अशी आशा वकारने शेवटी व्यक्त केली.

Related Stories

अश्विन सर्वोत्तम कसोटीपटू पुरस्काराच्या शर्यतीत

Patil_p

आयसीसीकडूनही गंभीर दखल, घटनेचा तीव्र निषेध

Patil_p

ब्राझिल, उरुग्वे संघांचे शानदार विजय

Patil_p

सनरायजर्स-आरसीबी एलिमिनेटर लढत आज

Patil_p

मुसळधार पावसामुळे तिसरा टी-20 सामना वाया

Patil_p

एप्रिल फूल साजरा करणार नाही : गुगल

tarunbharat
error: Content is protected !!