तरुण भारत

घरपट्टीवरील 5 टक्के सवलत देण्यासाठी मुदतवाढ

प्रतिनिधी/ बेळगाव

एप्रिल महिन्यात घरपट्टी भरणाऱया मालमत्ताधारकांना पाच टक्के कर सवलत देण्यात येते. मात्र लॉकडाऊन असल्यामुळे घरपट्टी भरणे कठीण झाले आहे. त्यामुळे कर सवलतीबाबत मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी पुढे आली आहे. याची दखल घेऊन नगरविकास खात्याने दि. 31 मे पर्यंत  5 टक्के कर सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मालमत्ताधारकांना दिलासा मिळाला आहे.

Advertisements

कोरोनामुळे संपूर्ण शहरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. लॉकडाऊनचा फटका महापालिकेला देखील बसला असून, घरपट्टी वसुलीचे उद्दिष्ट मार्च अखेरपर्यंत पूर्ण करता आले नाही. संपूर्ण मार्च महिना कोरोनाच्या धास्तीमुळे गेल्याने घरपट्टी वसूल करण्याची मोहीमदेखील थंडावली आहे. लॉकडाऊनमुळे  घरपट्टी भरण्यासाठी नागरिकांना बाहेर पडता आले नाही. एप्रिल महिन्यात घरपट्टी भरणाऱया मालमत्ताधारकांना घरपट्टीवर 5 टक्के करसवलत देण्यात येते. पण 15 एप्रिलपर्यंत लॉकडाऊनची घोषणा करण्यात आल्याने मालमत्ताधारकांना सवलतीचा लाभ घेता आला नाही.

 महानगरपालिका कार्यालय आणि बँकेमध्ये घरपट्टी भरण्यात येते. 5 टक्के कर सवलत 30 एप्रिलपर्यंत देण्यात येते. मात्र या मुदतीत नागरिकांना घरपट्टी भरणे अशक्मय आहे.  त्यामुळे घरपट्टी भरण्यासह कर सवलतीची मुदत वाढविण्यात यावी अशी मागणी प्रशासनाकडे करण्यात आली होती. याबाबत नगरविकास खात्याने चर्चा करून घरपट्टी भरण्यासह 5 टक्के करसवलतीमध्ये मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. 30 मे पर्यंत घरपट्टी भरून घेण्यासह 5 टक्के कर सवलत देण्याचा आदेश नगरविकास खात्याने स्थानिक स्वराज्य संस्थांना बजावला आहे. याबाबत जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्तांना याबाबतची सूचना करण्यात आली आहे.

Related Stories

बेंगळूर: केआर मार्केट ३१ ऑगस्टपर्यंत बंद : पालिका आयुक्त

Abhijeet Shinde

दीड महिन्यात ब्लॅक फंगसचे 33 बळी

Amit Kulkarni

बोरगाव येथे पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

Patil_p

बेकवाड शाळेतील शिक्षक बनविताहेत विद्यार्थ्यांसाठी मास्क

Patil_p

तिसऱया रेल्वेगेटनजीक मालवाहू बोलेरोला आग

Omkar B

भाविकांच्या देणगीतून मरगाई मंदिराचा जीर्णोद्धार पूर्णत्वास

Amit Kulkarni
error: Content is protected !!