तरुण भारत

काजूची वेळेत विक्री न झाल्यास व्यावसाय अडचणित येणार

वार्ताहर / दाभाळ

ग्रामीण कृषी अर्थकारणाचा कणा असलेला काजू हंगाम यंदा निम्यावर येऊन ठेपला असून लॉकडाऊनमुळे काजू कारखानदार व व्यापाऱयांनी काजू खरेदी बंद ठेवल्याने ग्रामीण भागातील शेतकऱयांवर बिकट परिस्थिती ओढवलेली आहे. राज्य सरकारने या गोष्टीचा गांभीर्याने विचार करून सोशियल डिस्टसिंग ठेवून कारखानदारांना व व्यापाऱयांना काजू खरेदीचे आदेश द्यावेत, अशी मागणी बेतोडा, निरंकाल पंचायत क्षेत्रातील काजू बागायतदारांनी केली आहे.

Advertisements

कोरोनाच्या जागतिक महामारीमुळे सध्या सर्व उद्योगधंदे व व्यापार ठप्प आहेत. त्याचा फटका काजू बागायतदाराबरोबरच कारखानदार व व्यापारीवर्गाला बसला आहे. ग्रामीण भागातील शेतकऱयांचे हे मुख्य उत्पादन असून त्यावर अनेक कुटुंबीयांचा उदरनिर्वाह चालतो. काजू विकून येणाऱया पैशांवर बऱयाच कुटुंबीयांचे वर्षभर नियोजन केले जाते. त्यासाठी शेतकऱयांसाठी हा हंगाम खूप महत्त्वाचा असतो. परंतु काजू पीक निम्म्यावर आले तरी काजू खरेदीला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे काबाड कष्ट करुनही योग्य वेळेत योग्य दराने काजूची खरेदी होईल काय अशा विवंचनेत काही बागायतदार सापडला आहे.

कारखानदार व व्यापारी चिंतेत

कारखानदार व व्यापारी वर्गाचीही चिंता वाढली आहे. कारखानदारांनीही काजू खरेदी करून त्या व्यवस्थित उनात वाळवाव्या लागतात. तसे न केल्यास काजू जास्त काळ टिकत नाहीत व आतील गर कुजतो. त्यासाठी जेवढय़ा लवकर काजू खरेदी करून उनात वाळवल्या जातील तेवढे चांगले. एकाचवेळी मोठय़ा प्रमाणात काजू खरेदी करुन त्या वाळत टाकणे कारखानदारांनाही शक्य होणार नाही, असे निरंकाल येथील सामंत कॅश्यू इंडस्ट्रीजचे मालक प्रशांत सामंत यांनी सांगितले. दोन वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या नोटबंदीमुळे काजू व्यवसायाला उतरती कळा लागली. शेतकऱयांबरोबरच कारखानदार, व्यापारीवर्ग अडचणीत आला. त्यामुळे गेल्या वर्षी काजूचा दर ही पुष्कळ खाली उतरला. पुन्हा कुठे या व्यवसायाला गती मिळत असताना कोरोना संक्रमणाने घेरले आहे. जगातील सर्व देशांची आर्थिक स्थिती खालवल्याने काजू निर्यात करणे ही शक्य होणार नाही. ग्राहकच मिळणार नसल्यास निर्यात होणे अवघड असल्याचेही प्रशांत सामंत यांनी सांगितले.

काजू बागायतदार विवंचनेत

ग्रामीण भागातील शतेकऱयांसाठी काजू हंगाम सर्वात जास्त महत्त्वाचा असतो. काजू पिकावर या शेतकऱयांची संसाराची आर्थिक गणिते बांधली जातात. ग्रामीण भागातील गरीब शेतकरी व्यापाऱयांकडून किंवा कारखानदारांकडून आगाऊ पैसे घेत घेतात. त्यामुळे या व्यवसायातील शेतकरी व्यापारीवर्ग व कारखानदार अडचणीत सापडले आहेत. काजू खरेदी व विक्री करण्यासाठी हा काळ महत्त्वाचा असतो. मे महिन्यात पावसाचा काही भरोसा नसल्याने काजू खरेदीची जिकिर व्यापारी उचलीत नाहीत.

लॉकडाऊन असताना सोशियल डिस्टसिंग ठेवून काजू खरेदी करणे शक्य आहे. त्यासाठी राज्य सरकारच्या परवानगीची आवश्यकता आहे. किंबहूना व्यापारी किंवा कारखानदारांना गावागावात जाऊन काजू खरेदी करण्यासाठी तरी मोकळीक द्यावी असेही येथील शेतकऱयांचे म्हणणे आहे.

आमदार प्रवीण झांटये यांनी सरकारकडे प्रस्ताव मांडावा

गोव्यातील सर्वात जुना व प्रसिद्ध काजू कारखाना झांटय़े कॅश्यू इंडस्ट्रीजचे प्रवीण झांटय़े राज्य सरकारचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. त्यांनी तरी काजू कारखानदारांची बाजू सरकार दरबारी योग्यरित्या मांडून लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करावेत अशीही मागणी होत आहे.

Related Stories

पणजीत 25 टक्केच हॉटेल्स, रेस्टॉरंट्स सुरु

Omkar B

पुढील आठवडय़ापासून कोरोना रुग्णांवर प्लाझ्मा थेरपी : मुख्यमंत्री

Patil_p

‘भंडारी मुख्यमंत्री’ हा सिसोदियांचा वैयक्तिक प्रश्न

Amit Kulkarni

गोमंतकीय पत्रकारांचा चाणक्य पुरस्काराने सन्मान

Amit Kulkarni

जुवारी पुलाची एक लेन चालू करणे अशक्मयप्राय

Amit Kulkarni

शाळांशी संबंधीत सर्वांचे लसीकरण होणे आवश्यक

Amit Kulkarni
error: Content is protected !!