तरुण भारत

आरोग्य खात्यातर्फे मुख्याध्यापकांसाठी ‘जीवन कौशल्यावर’ कार्यशाळा

  • शिक्षण खात्याचे सहकार्य  
  • उत्तर गोव्यातील 158 शिक्षकांनी घेतला लाभ
  • विविध विषयांवर उहापोह   
  • उपसंचालक मनोज सावईकर यांचा पुढाकार

दलत्या जीवनशैलीमुळे विद्यार्थ्यांना जीवघेण्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. निराशा, ताणतणाव यांचे विद्यार्थ्यामधील प्रमाण वाढले आहे आणि त्यातून व्यसनाधिनता व आत्महत्याही होताना दिसते. या पार्श्वभूमीवर आरोग्य खात्याच्या उत्तर गोवा जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम आणि शिक्षण खात्याच्या उत्तर गोवा विभागाने बार्देश, पेडणे, डिचोली व सत्तरी या चार तालुक्मयातील माध्यमिक विद्यालयातील मुख्याध्यापकांसाठी ‘जीवन कौशल्ये’ या विषयावर पाच कार्यशाळा घेतल्या. यात एकूण 158 मुख्याध्यापक सहभागी झाले होते. कार्यशाळेत क्रमिक शिक्षणासोबत आत्मजाणीव, समानुभूती, सृजनशील विचार, वस्तुनि÷ विचार, निर्णय कौशल्य, समस्या निवारण कौशल्ये, संवाद कौशल्य, नाते संबंध, तणाव नियोजन, भावना व्यवस्थापन आदी जीवन कौशल्यावर उहापोह करण्यात आला.

मोबाईल, सोशल मीडियामुळे पालक व शिक्षकांच्या नकळत विकृत अवास्तव माहिती आजच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचते. यावर मात करण्यासाठी विविध विचार कौशल्ये जाणीवपूर्वक विद्यार्थ्यांना देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन मनोविकार तज्ञ डॉ. रुपेश पाटकर यांनी केले. विद्यार्थ्यांना जर त्यांच्या क्षमता आणि मर्यादा पटवून दिल्या तर त्यांच्यात आत्मविश्वास येईल. निर्णय क्षमता शिकवणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले.

Advertisements

जीवनात समस्या येणारच पण नेमकी समस्या कोणती? त्याचे स्वरूप काय? ती सोडविण्याचे कोणते मार्ग उपलब्ध आहेत? त्या सोडविण्यासाठी पालक, मित्र, नातेवाईक, तज्ञांची मदत घेणे मुलांना शिकवले पाहिजे. काही समस्या प्रयत्न करूनही सुटणार नाहीत, त्या स्वीकारणे, हे देखील शिकवण्याची आवश्यकता आहे.

ताण येणे, राग येणे, चिंता वाटणे या भावना जरी अप्रिय असल्या तरी त्या हाताळणे आरोग्यादायी मार्ग आहेत. ते शिकवण्याची गरज आहे पण दुर्दैवाने अशा भावना कशा हाताळाव्यात याचे औपचारिक व अनौपचारिक शिक्षण मिळत नसल्याने वस्तू फेकणे, मारामारी करणे, शिव्या देणे, व्यसन करणे वगैरे रोगट पद्धतीने त्या हाताळल्या जातात. अडचणीवरची रोगट भावना कोणती व आरोग्यादायी भावना कोणती हे ओळखायला शिकवण्यापासून ध्यान, प्राणायाम, शवासन, वगैरे तंत्रे शिकवण्यापर्यंत प्रयत्न व्हायला हवेत.

उत्तर गोवा जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत ही कार्यशाळा घेण्यात आली. यात सल्लागार मनोविकार तज्ञ डॉ. रुपेश पाटकर यांच्यासहित मानसोपचार समुपदेशक दुर्गा च्यारी, सोशल वर्कर अश्विनी नाईक व परिचारिका मेलीसा डायस यांनी या कार्यशाळेत जीवन कौशल्यावर मार्गदर्शन केले. त्यांना उत्तर गोवा जिल्हा रुग्णालयाचे वरि÷ मनोविकार तज्ञ डॉ. राजेश धुमे यांचे मार्गदर्शन लाभले. बंगळुरू येथील राष्ट्रीय मानसिक आरोग्य आणि मेंदू विज्ञान संस्थेच्या मार्गदर्शक तत्वानुसार या शिबिर घेण्यात आले. ऱघ्श्प्Aऱए ने एकूण 52 जीवन कौशल्ये अधोरेखित केली आहेत.

या कार्यशाळांचे नियोजन आणि त्या यशस्वी होण्यासाठी शिक्षण खात्याचे उपसंचालक मनोज सावईकर यांचा विशेष पुढाकार लाभला. बार्देश, पेडणे, डिचोली व सत्तरीचे भागशिक्षणाधिकारी व प्रत्येक तालुक्मयाचे शिक्षण संकुल समिती यांनी सहकार्य केले. कार्यशाळा सत्तरी तालुक्मयातील शिक्षकांसाठी सत्तरी भाग शिक्षण अधिकारी कार्यालय- वाळपई, डिचोलीसाठी सांखळीतील सरकारी उच्च माध्यमिक विद्यालय, पेडणेचे भागशिक्षण अधिकारी कार्यालय, तर बार्देश तालुक्मयातील शिक्षकांसाठी दोन कार्यशाळा म्हापसा भाग शिक्षण अधिकारी कार्यालयात झाल्या.  मनोज सावईकर म्हणाले की, मानसिक आरोग्य क्षेत्रात कार्यरत असलेले डॉ. रुपेश पाटकर यांचे अनुभवाचे मार्गदर्शन शिक्षकांना लाभल्याने मुलांमधील मानसिक आरोग्याच्या प्रकरणे हाताळताना त्यांना मदत होईल.

वार्ताहर, पर्ये

Related Stories

सेल्फ मेडिकेशन टाळा

Patil_p

आरोग्य शिक्षणाचे पाऊल

Patil_p

कर्क रोगापासून सावधान…

Patil_p

सुरक्षेसाठी दक्षता घ्या

Patil_p

ऋतु आला लोणच्याचा

Patil_p

पॅलेसमध्ये हिटलरचा 28 टन सोन्याचा साठा

Patil_p
error: Content is protected !!