तरुण भारत

पेठ वडगावची युवती अखेर कोरोना निगेटीव्ह

प्रतिनिधी / पेठ वडगाव

इस्लामपूर येथील नातेवाईकांच्या संपर्कात येवून कोरोना पॉझिटीव्ह झालेल्या वडगाव येथील मुलगीचा रिपोर्ट अखेर निगेटीव्ह आला. यामुळे वडगाव शहरातील नागरिकांनी अखेर निश्वास सोडला. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन कायम पाळून नागरिकांनी दक्षता घेण्याची गरज असल्याचे मुख्याधिकारी सुषमा शिंदे यांनी व्यक्त केली. 

Advertisements

पेठ वडगाव येथील युवती इस्लामपूर येथील नातेवाईकांच्या संपर्कात येवून कोरोना पॉझिटीव्ह आली होती. यामुळे वडगाव शहरात एकच खळबळ उडाली होती. पालिका व पोलीस प्रशासन दक्ष होवून शहरात विविध उपाययोजना करून कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी यंत्रणा रात्रदिवस राबत आहे. या पार्श्वभूमीवर आज या युवतीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. यामुळे वडगाव शहरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. दरम्यान आज पाळलेला लॉक डाऊन नागरिकांनी शंभर टक्के पाळून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दिवसभर विविध भागात पोलिसांनी मोटारसायकल चालकांना अडवून कारवाई केल्याने मोटारसायकलस्वारांची धावपळ उडाली.

Related Stories

कोल्हापूर : लखीमपूर हिंसाचार निषेर्धात उचगावात कँडल मार्च

Abhijeet Shinde

जिल्हय़ात पुन्हा अवकाळी पावसाचा तडाखा

Patil_p

जि. प. सदस्य प्रवीण माने यांचे निधन

Abhijeet Shinde

राज्यात कोरोनामुक्त गाव स्पर्धा; पहिलं बक्षीस ५० लाख

Abhijeet Shinde

कोल्हापूर शहरात व्यापार्‍यांचा जनता कर्फ्यू!

Abhijeet Shinde

कोरोनासह साथरोग नियंत्रणाचे ‘आरोग्य’ पुढे आव्हान

Abhijeet Shinde
error: Content is protected !!