तरुण भारत

जयपूरमध्ये समूह संसर्गाचा धोका

शहराच्या 111 पैकी 97 रुग्ण एक किमी कक्षेतील

राजस्थानात कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढत आहे. बुधवारी सकाळी 4 वर्षीय मुलासह 5 नवे रुग्ण सापडले आहेत. यातील 3 जयपूरच्या रामगंज आणि घाटगेट भागातील आहेत. जयपूरमध्ये आतापर्यंत कोरोनाचे 111 रुग्ण आढळले आहेत. यातील 102 रुग्ण रामगंज आणि परिसरातील आहेत. तर 102 पैकी 97  बाधित केवळ 1 किलोमीटरच्या कक्षेतील रहिवासी आहेत. राजस्थानातील एकूण रुग्णांचा आकडा आता 348 वर पोहोचला आहे.

राज्यात आतापर्यंत 6 जणांना जीव गमवावा लागला आहे. तर मंगळवारी राज्यात 42 नवे रुग्ण सापडले होते. यात जोधपूरमध्ये 9, जैसलमेरमये 13, बांसवाडामध्ये 7, जयपूरमध्ये 6, भरतपूर आणि बिकानेरमध्ये प्रत्येकी 3 तर चूरूमधील एका रुग्णाचा समावेश आहे.

जयपूरमध्ये सापडलेल्या रुग्णांमध्ये 13 तबलिगी सदस्यांचा समावेश असल्याचे समजते. तर उर्वरित जणांना ओमानमधून परतलेल्या एका व्यक्तीच्या संपर्कामुळे कोरोनाची बाधा झाली आहे. सुमारे 10 दिवसांपासून रामंगज आणि परिसराला प्रतिबंधित करण्यात आले आहे.

जोधपूरमध्ये 30 रुग्ण

जोधपूर शहरात आतापर्यंत 13 महिलांसह एकूण 30 कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. यातील 3 जण तुर्कस्तानातून तर 3 जण इंग्लंडमधून परतले आहेत. तर मुंबईहून जोधपूरपर्यंत रेल्वेप्रवासादरम्यान तुर्कस्तानातून परतलेल्या दांपत्याच्या संपर्कात आल्याने एका युवतीला लागण झाली आहे.

नागौरमध्ये पथकाला रोखले

नागौरच्या मकरानामध्ये कोरोना संकटामुळे आरोग्य विभागाचे पथक शहरात स्क्रनिंग करत आहे. परंतु मंगळवारी या पथकाला विरोधाला तोंड द्यावे लागले आहे. येथील अनेक गल्ल्यांमध्ये लोकांनी एनआरसी आणि एनपीआर सुरू असल्याचा आरोप करत पथकाला स्क्रीनिंग करू दिले नाही. पथकासोबत गैरवर्तन करत रजिस्टर फाडण्यात आले आहे.

भीलवाडात उपाययोजनांना यश

भीलवाडामध्ये 29 मार्चपासून केवळ एक नवा रुग्ण आढळला आहे. तर 27 पैकी 14 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. यातील 9 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पूर्ण शहरात 13 एप्रिलपर्यंत महासंचारबंदी लागू करण्यात आली आहे.

झुंझुनू : सीमेवरच तपासणी

झुंझुनूमध्ये 23 रुग्ण सापडले असून येथील 8 भागांमध्ये कोरोनाने शिरकाव केला आहे. कोरोना संसर्गाचा वाढता धोका पाहता सीमाक्षेत्र बंद करण्यात आले आहे. जिल्हय़ातील प्रवेशाच्या सर्व मार्गांवर वैद्यकीय पथक तैनात राहणार असून प्रत्येक व्यक्तीची तपासणी केली जाणार आहे. तपासणीत संशयास्पद आढळल्यास संबंधित व्यक्तीला थेट क्वारेंटाईनमध्ये पाठविले जाणार आहे.

Related Stories

संरक्षण समितीच्या बैठकांना राहुल गांधींची कायम दांडी

Patil_p

केंद्रीय कर्मचाऱयांची ‘धन’ होणार

Patil_p

बाबरी मशीद विध्वंस प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता

datta jadhav

नवा अध्यक्ष निवडेपर्यंत सोनिया गांधीच नेत्या

Patil_p

राममंदिर ट्रस्टच्या अध्यक्षपदी भागवतांच्या नियुक्तीसाठी उपोषण

prashant_c

हवाई दलाकडून 33 लढाऊ विमाने खरेदीचा सरकारला प्रस्ताव

datta jadhav
error: Content is protected !!