तरुण भारत

लांजा तालुक्यातील शिवसेनेकडून कोरोना आपत्तीसाठी निधी

प्रतिनिधी/ लांजा

शिवसेना सचिव,खासदार विनायकजी राऊत ह्यांच्या मार्गदर्शनाखाली माजी जिल्हा परिषद सभापती दत्ता कदम यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून लांजा तालुक्यातील शिवसैनिकांनी राज्यातील कोरोना विषाणू आपत्तीसाठी 51 हजार रुपयांची रोख रक्कम मुख्यमंत्री सहायता निधी म्हणून शासनाकडे सुपूर्द केली. शिवसैनिकांच्या या मदतीमुळे सर्वत्र त्यांचे कौतुक केले जाते आहे.

Advertisements

लांजा पं. स चे माजी सभापती व जि प चे माजी बांधकाम व आरोग्य सभापती दत्ता कदम यांचा 8 एप्रिल रोजी वाढदिव होता. याचेच औचित्य साधून दत्ता कदम यांनी वाढदिवस साजरा न करता कोरोना आपत्तीसाठी मदत करण्याचा निश्चय केला होता. आपत्तीसाठी आर्थीक मदत करण्याचे आवाहन तालुक्यातील शिवसैनिकांना केले होते. त्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन लांजा तालुक्यातील शिवसैनिक व हितचिंतक यांनी कोरोना आपत्तीला तोंड देण्यासाठी 51 हजार रुपयांची रक्कम गोळा केली. त्यापैकी महाराष्ट्रचे माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठबळ देण्याकरिता मुख्यमंत्री सहाय्यता निधी म्हणून 25 हजार रुपये यासह कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लांजा तालुक्याचा मदत निधी म्हणून तहसिलदार यांच्याकडे रोख रक्कम रुपये दहा हजार रुपये जमा केले. व निधीमधून लांजातालुका पोलीस यंत्रणा,आरोग्य यंत्रणा यांना सहकार्य करण्याचा व 100 ते 150 गरजुंना 1 महिना पुरेल एवढे अन्नधान्य पुरवण्याचा संकल्प 8 रोजी कदम यांच्या वाढदिवसादिनी करण्यात आला आहे. यासाठी लांजा नजरपंचायतीचे नगराध्यक्ष मनोहर बाईत, शिवसेना देवधे विभागसंघटक रविंद्र डोळस, डीआरडीए समिती सदस्य योगेश पाटोळे, पंचायत समिती सदस्य श्रीकांत कांबळे, अनिल कसबले, शिवसहकार उपतालुका संघटक रविकांत शिकरे, उपविभागप्रमुख राजेंद्र पालये, युवासेना तालुका समन्वयक निखिल माने, सरपंच शशिकांत कदम, देवेंद्र लोटणकर, स्वप्नील शिंदे, संतोष धामणे, शिवसहकार उपविभाग संघटक राजू घडशी, विलास बेर्डे, शाखाप्रमुख राजेंद्र सुर्वे, संतोष लिंगायत, महेंद्र राऊत, महेश शिंदे, दिलीप चव्हाण, संदीप सावंत, प्रसाद जठार,श्रेयस शेटय़े,भालचंद्र बोडस, रणजित गांगण, उद्योजक राजू जाधव, युवासेना शाखाधिकारी निलेश कातकर, राजू बाने, राजू शेरे, विठ्ठल इंगळे, प्रकाश गुरव, सुरेश भालेकर हे मेहनत घेत आहेत.

Related Stories

रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकर्‍यांना 13 लाख 12 हजारांचा वीमा परतावा

triratna

वालरसच्या दातांची तस्करी – तिघांना अटक

Patil_p

खासगी रुग्णालयातील बिल तपासणीसाठी ‘ऑडिटर’ नेमा!

Patil_p

तब्बल पाच पथकांकडून तपासणी

NIKHIL_N

राजापूरात एक दिवा जवानांसाठी

Patil_p

मुख्याध्यापकासह काही शिक्षक पॉझिटिव्ह

NIKHIL_N
error: Content is protected !!