तरुण भारत

दुचाकीवरून बेळगावला निगालेले बांधकाम मजूर ताब्यात

वार्ताहर / शिये

संचारबंदीच्या काळात रात्रीच्या वेळी पोलिसांची नजर चुकवून बेळगावाकडे जाणाऱ्या बांधकाम मुजुरांना शियेफाटा येथे शिरोली एमआयडीसी पोलीसांनी ताब्यात घेतले. यामध्ये नऊ पुरुष, पाच महिला व चार मुलांचा समावेश आहे. पोर्ले(ता.पन्हाळा) या गावातून बाहेर पडून वडणगे, निगवे – शिये मार्गे राष्ट्रीय महामार्गावरून हे मजूर बेळगावला जाणार होते. लॉकडाऊनमुळे सर्वच कामे थांबली असल्यामुळे या मजुरांनी आपल्या गावी जाण्याचा निर्णय घेतला होता. हे सर्वजण सात मोटारसायकली वरून निघाले होते.

Advertisements

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन असल्याने जिथे आहे तिथे थांबण्याचे आदेश असतानाही शासकीय आदेशाचे उल्लंघन करून हे आपल्या गावी निघाले होते. १) मोहम्मद शरीफ इब्राहिम खताल (२) मुगुत सौवनुर ३) रफिक फकरुसाहब हंचीकट्टी ४)सुभानी फकरुसाहब हंचीकट्टी ५)सय्यद मैनुदीन पठाण ६) मुगुटसाहब जुनुसाहब खाजी ७) ईमाम जाफरसाहब मुल्ला ८) सुभान हनिफ कितूर ९)आरबाज यासिन चिकोडी १०) सलमान मखतुम पाचापुर ११) नगमा मुगुट सौवनुर ११) रेश्मा हंचीकट्टी १२) अफसाना सुभान कित्तुर १३) सलमा हंचीकट्टी १४) फातिमा मौलासाहब मुल्ला व चार लहान मुले ( मुळगाव चुंचवाड, ता. खानापूर, जि.बेळगाव ) अशी त्यांची नावे आहेत. हे सर्वजण पोर्ले येथील बांधकाम ठेकेदार दस्तगीर हवालदार यांच्याकडे काम करत होते. हे सर्व जण रात्री १२: ४५ वाजता शिये फाटा मार्गे बेळगाव कडे जात असताना शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार जी.एम. मिरका, हवालदार अशोक माने, चालक हवालदार विश्र्वास पाटील व होमगार्ड सुरज सोनुले यांनी कारवाई केली.

पोर्ले हे गाव पन्हाळा पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात येत असल्याने शिरोली औद्योगिक पोलिसांनी या सर्वांना पन्हाळा पोलिसांच्या ताब्यात दिले महिला व लहान मुले असल्यामुळे पोलिसांनी त्यांना समज देऊन लॉक डाऊन उठेपर्यंत पोर्ले येथेच राहण्याचे आदेश दिले आहेत.

Related Stories

बलात्कार पिडितेला न्याय द्या…

Patil_p

सातारा : १३८ रिपोर्ट निगेटिव्ह तर एक मृताचा स्त्राव पाठवला तपासणीला

triratna

उदयनराजे कोर्टकामी न्यायालयात

Patil_p

नवे पारगावात विहिरीत बुडून बालकाचा मृत्यू

triratna

कोल्हापूर : राज्याच्या अर्थसंकल्पात वस्त्रोद्योगाला ठेंगाच; उद्योजकांतून नाराजीचा सूर

triratna

शाहूवाडी तालुक्यात आज अखेर १०६ रूग्ण कोरोनामुक्त

Shankar_P
error: Content is protected !!