तरुण भारत

देशात गेल्या 24 तासात 549 रुग्णांची भर 

ऑनलाइन टीम / नवी दिल्ली :

भारतात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत, तसेच मृत्यू दरात वाढ होत आहे. गेल्या 24 तासात 549 रुग्णांची भर पडून देशभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या 5 हजार 734 वर पोहचली आहे. तसेच 24 तासात 17 जण दगावले आहेत. देशात 166 कोरोना रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. तर 473 रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.

Advertisements

ते म्हणाले, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य मंत्रालयाच्या दहा पथकांना नऊ राज्यांमध्ये पाठवण्यात आले आहे. तसेच पीपीई किट, व्हेंटिलेटर चा पुरवठा सर्वत्र सुरू आहे. मात्र, पीपीई किटची सर्वांनाच गरज नाही आहे. हाय रिस्क असणाऱ्या ठिकाणीच  पीपीई किटची आवश्यकता आहे. गरज पडेल तेथे किट पुरवले जातील, असं ही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 

पुढे ते म्हणाले, कोरोना लढ्यात रेल्वेची मोठी मदत मिळत आहे. रेल्वेच्या 5 हजार कोचेसमध्ये देखील तात्पुरते आयसोलेशन वार्ड सुरू केले जातील. त्यापैकी साडे तीन हजार कोचेसमध्ये आयसोलेशनचे काम पूर्ण झाले आहे.

Related Stories

महाराष्ट्रात मागील 24 तासात 6,185 नवे कोरोनाग्रस्त; 85 मृत्यू

pradnya p

पाकिस्तानच्या सैन्याला राजकीय आव्हान

Patil_p

दिवाळीची सुट्टी वाढवली; विद्यार्थी आणि शिक्षकांना उद्यापासून 14 दिवसांची सुट्टी

pradnya p

लॉकडाऊनमध्ये ‘या’ राज्यपालांनी लिहिली 13 पुस्तके

datta jadhav

लोकसभेत भाजप-काँग्रेसचे नेते भिडले

Patil_p

मुंबई शहर, उपनगरात आजही अतिवृष्टीचा इशारा

pradnya p
error: Content is protected !!