तरुण भारत

‘धन्यवाद प्रिय मित्रा!’ इस्त्राईलच्या पंतप्रधानांनी मानले मोदींचे आभार

ऑनलाइन टीम / जेरूसलम :

संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरस थैमान घालत आहे. कोरोनावरील उपचारात हायड्रॉक्लोरोक्वीन औषध महत्त्वाची भूमिका बजावत आहे. अनेक देशांनी भारताकडे या औषधावरील निर्यात बंदी उठवावी यासाठी मागणी केली होती. त्यानंतर भारताने या औषधावरील बंदी उठवत याची निर्यात सुरू केली.

Advertisements

या निर्णयानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तोंडभरून कौतुक केले. त्यानंतर आता इस्रायलचे पंतप्रधान बेन्यामिन नेत्यानाहू यांनी देखील ट्विट द्वारे मोदींची स्तुती केली आहे. 

ते आपल्या ट्विट मध्ये म्हणाले की, हायड्रॉक्लोरोक्वीन पाठवल्याबद्दल माझे प्रिय मित्र नरेंद्र मोदी यांचे धन्यवाद. आम्हाला मदत केल्याबद्दल मी मोदी यांचे मी आभार मानतो. 

दरम्यान, याआधी डोनाल्ड ट्रम्प आणि ब्राझीलचे अध्यक्ष बोल्सोनारो यांनी देखील मोदी यांचे आभार मानले आहेत. बोल्सोनारो यांनी तर मोदींची तुलना थेट लक्ष्मणासाठी संजीवनी आणणाऱ्या हनुमानाशी केली होती. 

Related Stories

कोरोनाचा कहर : महाराष्ट्रात 1 लाख 06 हजार 070 सक्रिय रुग्ण

Rohan_P

पंजशीरमध्ये तालिबानच्या ७०० दहशतवाद्यांचा खात्मा केल्याचा दावा

Abhijeet Shinde

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांची प्रकृती खालावली, आयसीयूमध्ये हलविले 

prashant_c

एमपीएससीबाबत ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; एसईबीसी अंतर्गत येणााऱ्या विद्यार्थ्यांची वयोमर्यादा वाढवली

Abhijeet Shinde

बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचे शुद्धिकरण; नारायण राणेंची खोचक प्रतिक्रिया, म्हणाले…

Abhijeet Shinde

लॉकडाऊन काळात शालेय फी जमा करण्यासाठी सक्ती करू नये – वर्षा गायकवाड

Abhijeet Shinde
error: Content is protected !!