तरुण भारत

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या प्रकृतीत सुधारणा, आयसीयूमधून बाहेर

ऑनलाइन टीम / लंडन :

ब्रिटन चे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून त्यांना आता आयसीयूमधून बाहेर आणण्यात आले आहे. मात्र अजूनही त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीत ठेवण्यात येणार आहे.

Advertisements


दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून बोरिस जॉन्सन हे कोरोनाशी लढा देत आहेत. 27 मार्च रोजी त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्यांनी स्वतःहून आपल्याला कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती ट्विटर च्या माध्यमातून दिली होती. त्यानंतर ते एकांतवासात होते.


मात्र, अनेक दिवस होऊनही त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा न झाल्याने त्यांना 6 एप्रिलला हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले होते.
दरम्यान, उपचार सुरू असताना जॉन्सन यांची प्रकृती अधिक खालावल्याने त्यांना आयसीयूमध्ये हलविण्यात आले होते. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. आता व्हेंटिलेटर ची गरज नाही असे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे.


दरम्यान, हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यापूर्वी ते पंतप्रधान पदाची सारी जबाबदारी पार पाडत होते. मात्र, त्यानंतर त्यांनी विदेश मंत्री डोमनिक रॉब यांची आपल्या जागी नियुक्ती केली.

Related Stories

एका कॉलवरुन ९०० कर्मचाऱ्यांना बेरोजगार करणाऱ्या भारतीय CEO ने मागितली माफी; म्हणाले…

Abhijeet Shinde

कोरोनावर फिनलंडची मात

Patil_p

महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 7717 नवे कोरोना रुग्ण; तर 282 मृत्यू

Rohan_P

भारत बायोटेकची कोवॅक्सिन लस तिसऱ्या टप्प्यातील चाचणीत 77.8 टक्के प्रभावी!

Rohan_P

चोरीला गेलेले सोने तब्बल 22 वर्षानंतर परत

Sumit Tambekar

मुंबई : सीएसएमटी स्थानकात बॉम्ब ठेवल्याची अफवा; पोलिसांची कसून तपासणी

Rohan_P
error: Content is protected !!