तरुण भारत

कौंटी क्रिकेटपटूंच्या वेतनामध्ये कपात

लंडन :

कोरोना व्हायरसच्या महामारीमुळे संपूर्ण ब्रिटनमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. इंग्लंडमधील सर्व क्रीडास्पर्धा लांबणीवर किंवा रद्द करण्यात आल्या आहेत. इंग्लंडमधील कौंटी क्रिकेट स्पर्धा 28 मे पर्यंत तहकूब करण्यात आली आहे. या संकटामुळे क्रिकेट स्पर्धेवर आर्थिक समस्येचे संकट निर्माण झाले आहे. इंग्लीश कौटीं क्रिकेट स्पधेतील क्रिकेटपटूंनी आपल्या वेतनश्ा़खsणीतील काही रक्कम स्वखुशीने देण्याची तयारी दर्शविली असल्याचे इंग्लंडच्या व्यावसायिक क्रिकेटपटू संघटनेतर्पे सांगण्यात आले.

Advertisements

इंग्लीश कौंटी क्रिकेट स्पर्धेची एकूण बक्षीसाची रक्कम 1.24 दशलक्ष डॉलर्स आहे पण कोरोना प्रसारामुळे या बक्षिसाच्या रकमेला धक्का पोहचू नये यासाठी एप्रिल आणि मे महिन्याच्या इंग्लीश कौटी क्रेकेट स्पर्धेतील क्रिकेटपटूच्या वेतनश्रेणीमध्ये काही रकम कपात केली जाणार आहे.

या संदर्भात इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळ व व्यवसायिक क्रिकेटपटू संघटना यांच्यात संयुक्तपणे नवा करार झाला आहे. इंग्लंड क्रिकेट मंडळाशी मध्यवर्ती करार केलेल्या क्रिकेटपटूनी पाच लाख पौंडची रकम कोरोनागस्तांच्या मदतीसाठी दिली आहे. इंग्लंडच्या महिला क्रिकेटपटूच्या तसेच प्रशिक्षक वर्गाच्या वेतनश्रेणीमध्ये कपात करण्यात आली आहे. लंडनमधील दोन हॉस्पिटलकरिता क्रिकेटपटू बटलरने 65,100 पौंडस्ची रकम मदत म्हणून दिली आहे.

Related Stories

स्टीपलचेसमधील केनियन वर्चस्व संपुष्टात

Patil_p

गावसकर बॉक्सचे उद्घाटन लवकरच

Patil_p

आर्चर वनडे मालिकेतून बाहेर

Patil_p

रणजी क्रिकेट स्पर्धेला 5 जानेवारीपासून प्रारंभ

Patil_p

भारतीय हॉकी संघांचा युरोपियन दौरा अधांतरी

tarunbharat

बीसीसीआयतर्फे लेव्हल-2 प्रशिक्षण शिबीर

Patil_p
error: Content is protected !!