तरुण भारत

मसाला शेवगा

साहित्य : 2 शेवग्याच्या शेंगा, 2 चमचे तेल, पाव चमचा हळद पावडर, 2 चमचे मालवणी मसाला, 1 कांदा बारीक चिरून, 1 वाटी खवलेलं ओलं खोबरं, 4 ते 5 कढीपत्ता पाने, सजावटीसाठी बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीपुरते मीठ

कृती : शेवग्याच्या शेंगाची साल काढून त्याचे एक इंचाचे तुकडे करून घ्यावेत. पॅनमध्ये तेल गरम करून त्यात कढीपत्ता टाकावा. नंतर त्यात कांदा टाकून गुलाबी रंगावर परतवून घ्यावा. आता त्यात शेंगाचे तुकडे आणि हळद पावडर टाकून मिश्रण चांगले परतवून घ्यावे. त्यात थोडंसं पाणी मिक्स करून नंतर त्यात मालवणी मसाला टाकून मिश्रण मिक्स करून शिजवून घ्यावे. दुसऱया पॅनमध्ये चमचाभर गरम तेलात कांदा आणि ओलं खोबरं हलक्या लालसर रंगावर परतवून घ्यावे. मिश्रण गार झाले की मिक्सरला लावून वाटण बनवावे. तयार वाटण शेंगाच्या मिश्रणात मिक्स करावे. वरुन मीठ टाकून भाजी हलके गरम करून घ्यावी. तयार भाजी कोथिंबीरीने सजवून जेवणासोबत खाण्यास द्यावी.

Advertisements

Related Stories

कोझुकट्टाई

tarunbharat

क्रिस्पी व्हेजिटेबल्स

Omkar B

चटपटीत रिंग

Omkar B

एग्ग रोस्ट

tarunbharat

आवळा मुरांबा

tarunbharat

शेवगा-कढी पकोडा

Omkar B
error: Content is protected !!